Wednesday, August 26, 2026
Homeआरमोरीमामाच्या मुलासोबत गावात नाटक पाहायला गेली अन् त्याच रात्री १७ वर्षीय मुलगी...

मामाच्या मुलासोबत गावात नाटक पाहायला गेली अन् त्याच रात्री १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली.. – आरमोरी तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-राज्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याची प्रमुख कारणे ही वेगवेगळी असू शकतात.मात्र, सध्या स्थितीत १५ ते १८ वयोगटातील मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे.विशेषतः काहीजण प्रेमाच्या आमिषाला बळी पडतात,तर काहीजण घरचे रागावल्याने,गरिबी,नैराश्य व इतर कारणांमुळे बेपत्ता होत असल्याचे चित्र आहे.अश्यातच गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यात एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे,घटनेच्या दिवशी अल्पवयीन मुलगी व तिच्या मामाचा मुलगा गावात नाट्य प्रयोगाचे कार्यक्रम असल्याने ते पाहण्यासाठी गेले होते. मात्र,त्याच रात्रीपासून मुलगी बेपत्ता झाल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त झाले आहेत.सदरचा प्रकार हा आरमोरी तालुक्याच्या रामपूर येथे गुरुवार ४ डिसेंबर रोजी घडला असून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आजी-आजोबांकडे महिनाभरापासून वास्तव्यास होती. गुरुवार ४ डिसेंबर रोजी रामपूर गावात नाटकाचे सादरीकरण असल्याने अल्पवयीन मुलगी व मामाचा मुलगा दोघेही नाटक पाहायला गेले होते.रात्री १.१० वाजता ती नाटकातून बाहेर पडतांना दिसली; त्यानंतर मात्र ती कुठेही आढळून न आल्याने मामाच्या मुलाने सदरची माहिती घरी जाऊन दिली.कुटूंबीय तसेच नातलगांनी शोध घेतला असता तिचा कुठेही थांगपत्ता लागलेला नसल्याने अखेर कुटुंबीयांनी आरमोरी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.त्यानुसार,पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप मोहुर्ले करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!