Tuesday, October 20, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा.. -दहा दिवसांत निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा...

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा.. -दहा दिवसांत निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-सन २०२६ च्या खरीप हंगामात अनियमित पाऊस,वाढते तापमान,वादळ,कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच वन्यप्राण्यांमुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व अनुदान देण्यात यावे,अशी मागणी शेतकरी बांधवांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यासंदर्भात सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस,कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांना देसाईगंज तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
पीक नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून,शेतीसाठी केलेला खर्च वसूल करणे,कर्जफेड करणे आणि पुढील हंगामाची तयारी करणे कठीण झाले आहे.त्यामुळे शासनाने तातडीने पीक नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व आवश्यक अनुदान द्यावे,तसेच देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
  • दहा दिवसांत निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण👇
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निवेदन प्राप्त झाल्यापासून दहा दिवसांच्या आत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करावी.अन्यथा,येत्या २ नोव्हेंबर २०२६ पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल,असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने लक्ष देऊन दिलासा द्यावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शेतकरी प्रशांत देवतळे,रवी पिलारे,भारत ढोरे, मनोहर पिलारे,सतीश खरकाटे,हरिभाऊ पत्रे,दिनेश बेदरे,संतोष कुथे,दीपक प्रधान,यादव फटिंग,ज्ञानेश्वर कवासे,पुरुषोत्तम उरकुडे,प्रकाश बेदरे,वामन राऊत, गुरुदेव ठाकरे,पांडुरंग नागोसे,पंकज धोटे,बाळकृष्ण कुंभलवार,नानाजी ठेंगरी,नितीन राऊत,लोकमान्य बरडे,प्रमोद लोथे,बाळकृष्ण पिलारे आणि फाल्गुन नखाते यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतात धान कापण्यासाठी गेली ती परतलीच नाही; वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून ऐन सणाच्या दिवशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शेतावर धान कापणीसाठी गेलेल्या वृध्द महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार...

गडचिरोली सायबर कमांडो पथकाची उल्लेखनीय कामगिरी.. -हरवलेले तब्बल ६ लाख रुपये किंमतीचे २१ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विजयादशमी हा सण सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईट प्रवृत्तींवर विजय मिळविण्याचा संदेश देतो.याच शुभमुहूर्तावर आज गडचिरोली पोलीस स्टेशनने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद...

‘तिच्या’ त्रासाला अन् वादाला वैतागला; शिक्षकाने केली प्रेयसीची हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असलेल्या प्रेमाचा शेवट अखेर प्रेयसीच्या हत्येने झाल्याची घटना नुकतीच चंद्रपुरात उघडकीस आली.प्रेयसीच्या हत्येप्रकरणी आरोपी शिक्षकास अटक करून...

आज दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या स्मृतींना उजाळा देणारा ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!