Sunday, July 19, 2026
Homeदेसाईगंजमोठी बातमी..! लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार.. - देसाईगंजच्या नामांकित...

मोठी बातमी..! लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार.. – देसाईगंजच्या नामांकित सराफा व्यापाऱ्यास अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार देसाईगंज शहरात उघडकीस आला आहे.आपली फसवणूक होत असल्याची माहिती होताच तरुणीने संबंध तोडण्याचा प्रयत्न केला असता सहकारीच्या मदतीने तिच्यावर पाळत ठेवून धमकवण्यात आले. तरुणीने होणाऱ्या जाचाला कंटाळून अखेर आज,रविवार १७ ऑगस्ट रोजी देसाईगंज पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून देसाईगंज पोलीस ठाण्यात अप.क्र.४२२/२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४ (२)(एम)६९,७८,३५१,(२)३(५) अन्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.सुनिल पुंडलिक बोके वय ४८ वर्षे, रा.गांधीवार्ड,देसाईगंज व त्याला सहकार्य करणारा  अक्षय कुंदनवार वय ३२ वर्षे रा.मधुबन कॉलनी, देसाईगंज,जि.गडचिरोली अशी आरोपींची नावे आहेत.
देसाईगंज शहरातील नामांकित राधा ज्वेलर्सचे सराफा व्यापारी ४८ वर्षीय सुनिल बोके यांनी एका खासगी बँकेत काम करणाऱ्या २३ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले व वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले.अश्यातच पीडित तरुणीला आरोपीचे विवाह झाले असल्याची माहिती होताच तिने संबंध तोडण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे आरोपी सुनिल सोबत बोलने टाळुन त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला.तरुणीने बोलणे टाळले म्हणून आरोपी सुनीलने माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझे अश्लिल फोटो सोशल मिडीयावर वायरल करण्याची धमकी दिली.त्यानंतरही आरोपी सुनीलने प्रकरणातील सहआरोपी अक्षय कुंदनवार याला पिडीत तरुणीच्या पाठलागावर ठेवले.अक्षयने तरुणीला सुनीलचा नंबर ब्लैकलिस्ट मधुन काढुन टाक व त्याला भेटण्यासाठी धमकावले.सततच्या होणाऱ्या जाचापायी तरुणी कंटाळली व तिने देसाईगंज पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप आगरकर यांनी आरोपी सुनिल बोके व अक्षय कुंदनवार यांना अटक केली व आज रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप आगरकर करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

व्हॉट्सॲपवरील ‘एपीके’ फाइलने केला घात; दहा लाखाला गंडा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका निवृत्त कर्मचाऱ्याला मोबाईल व्हॉट्सॲपवर पाठवलेली बनावट 'एपीके' फाइल उघडणे चांगलेच महागात पडले आहे.फाईल उघडताच सायबर चोरट्यांनी मोबाईल हॅक करून त्यांच्या...

चीमुकलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या वृद्धाला अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती पोलिस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक व किळसवाणा प्रकार समोर आला आहे.परिसरातील इतर मुलांसोबत खेळत असलेल्या एका ४ वर्षीय चीमुकलिशी...

पोलिसांनी पकडले सुगंधीत तंबाखूचे मोठे १० पोते..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-सध्याच्या घडीला राज्याच्या विविध भागात अवैध सुगंधित तंबाखू,गुटखा व इतर मादक पदार्थ विक्री तथा त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू असतांनाच...

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या समान निधी(Matching Schemes)व असमान निधी(Non-Matching Schemes)योजनांद्वारे राज्यातील शासनमान्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!