Tuesday, October 27, 2026
Homeदेसाईगंजमोठी बातमी; अज्ञात वाहनाच्या धडकेत १४ वर्षीय तरुणी जागीच ठार…-देसाईगंज जैव विविधता...

मोठी बातमी; अज्ञात वाहनाच्या धडकेत १४ वर्षीय तरुणी जागीच ठार…-देसाईगंज जैव विविधता उद्यान जवळील आज सकाळची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

 

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज शहरापासून काही अंतरावर आरमोरी मार्गे वन विभागाच्या जैव विविधता उद्यान(फॉरेस्ट गार्डन/पार्क)नजिक अज्ञात वाहनाच्या धडकेत १४ वर्षीय तरुणी जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक-१ जून रोजी सकाळी ५ ते ५.३० वाजेच्या दरम्यान घडली.शर्वरी पदमाकर बनकर, वय १४ वर्षे,रा.तुकुम वार्ड,देसाईगंज(वडसा) जि.गडचिरोली,असे वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,शर्वरी ही नेहमी प्रमाणे आज पहाटे घरून व्यायाम करण्याकरिता फिरायला निघाली होती.जात असतांना वाटेतच देसाईगंज-आरमोरी मार्गावरील वन विभागाच्या जैव विविधता उद्यान (फॉरेस्ट गार्डन/पार्क) नजिक मुख्य डांबरीकरण मार्गावर सकाळी अज्ञात वाहनाने धडक दिली.धडक देऊन डोक्यावरून वाहन गेल्याने त्यात तिचा जबडा बाहेर निघाला व डोक्याला जबर मार लागल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला.घटना स्थळावरून अज्ञात वाहन धडक देऊन पसार झाला.मात्र,आज सकाळी ५ ते ५.३० वाजेची घटना असल्याने कुणाच्याही लक्षात आली नाही.त्यामुळे अनेकजण संभ्रमात असल्याचे लक्षात येते.काही वेळानंतर सदरची घटना मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच,त्यांनी याबाबत देसाईगंज पोलिसांना माहिती दिली.देसाईगंज पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन तरुणीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला. घटनेचा तपास ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलीस प्रशासन करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उपाययोजनांचे सकारात्मक फलित; गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये २७ टक्के घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत २७ टक्के घट नोंदविण्यात आली...

विधान परिषद निवडणूक; उद्याला तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या उमेदवारांचा फैसला..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली.यामध्ये नागपूर पदवीधर...

ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागपूरहून ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील तीन महिलांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात सापळा...

धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग; जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-राज्य परिवहन महामंडळाच्या एका धावत्या इलेक्ट्रिक 'शिवाई' बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!