- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
पुणे :-राज्य परिवहन महामंडळाच्या एका धावत्या इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास पुणे शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या स्वारगेट परिसरातील अपोलो हॉस्पिटलसमोर घडली.घटनेत बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व १७ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.मात्र,क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण बस जळून खाक झाली.
एसटी महामंडळाची इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बस आज सकाळच्या सुमारास १७ प्रवाशांना घेऊन स्वारगेटच्या दिशेने निघाली असता अपोलो हॉस्पिटलजवळ येताच
गाडीतून अचानक धूर येऊ लागला व आग भडकू लागली.गाडीला आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास येताच बस चालकाने प्रसंगावधान राखत गाडी तात्काळ रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी उभी केली व प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले.सदर प्रकाराची माहिती होताच स्थानिक नागरिक,पोलीस व अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.क्षणात आगीच्या घटनेने परिसरात धुराचे मोठे लोट पसरले.दरम्यान,अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ पाण्याचा मारा करून भीषण आगीवर नियंत्रण मिळवले.धावत्या बसला नेमकी आग कशामुळे लागली? याचे ठोस कारण अद्याप समोर आले नसून,शॉर्ट सर्किटमुळे गाडीने अचानकपणे पेट घेतला असावा,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
- Advertisement -

