Saturday, September 5, 2026
Homeपुणेपर्यटनाचा आनंद लुटणे जीवावर बेतले; दोघांचा डॅममध्ये बुडून मृत्यू..

पर्यटनाचा आनंद लुटणे जीवावर बेतले; दोघांचा डॅममध्ये बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-जिल्ह्याच्या लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक म्हणजे भुशी डॅम.! पावसाळ्यात तेथील धबधब्यासारखे वाहणारे पाणी पर्यटकांना मंत्रमुग्ध करून सोडतात.पाण्याच्या थंड प्रवाहात भिजण्याचा आनंद घेत पर्यटक गर्दी करीत असतात. अश्याच प्रकारे आज,रविवार ८ जून रोजी दहा मित्र डॅम परिसरात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. यातील दोघेजण डॅमच्या(धरण) धबधब्याजवळील पाण्यात उतरले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. अश्रफअली शेख,रा.डांगे चौक,पिंपरी-चिंचवड,पुणे तर मोहम्मद जमाल शेख रा.तुलापुर,उत्तर प्रदेश अशी मृत तरुणांची नावे आहेत.
सध्या स्थितीत मुसळधार पावसाने धरणे,नदी,नाले फुगून भरली आहेत.त्यामुळे पर्यटन प्रेमी नैसर्गिक  सानिध्याकडे वळलेली दिसून येतात.अश्याच प्रकारे आज रविवारी दहा मित्रांनी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमची निवड केली.त्यानुसार मौज मजा सुरू असतांनाच दहा जणांपैकी दोघांनी प्रशासनाने भुशी डॅम परिसरात लावलेल्या तारेचे कुंपण ओलांडून डॅमच्या  पाठीमागील धबधब्याजवळ गेले.तिथून त्यांनी पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला,मात्र त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने अश्रफअली आणि मो. जमाल यांचा बुडून मृत्यू झाला.मित्रांनी आरडाओरड केली. मात्र,तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले असता दोघांचे मृतदेह दुपारच्या सुमारास पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!