Monday, August 24, 2026
Homeपुणेधावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या(पीएमपी)बसच्या सोरील दरवाजातून खाली पडून एका २५ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला.विशेष म्हणजे,बसमधून खाली कोसळताच ही तरुणी जवळूनच जाणाऱ्या एका स्कूल बसच्या चाकाखाली आली.त्यामुळे तिचा मृत्यू झाला. कांचन बलवंत खड्डा वय २५ वर्षे,रा.कृष्णा हॉस्टेल, डीआयएटी कॅम्पस,गिरीनगर,खडकवासला,पुणे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती मूळची राजस्थान येथील रहिवासी आहे.कांचन ही अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती.कांचन आज सकाळी खानापूरकडून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या पीएमपी बसमधून प्रवास करीत होती.बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने कांचन पुढील दरवाजाजवळ उभी असतांना तिचा अचानकपणे तोल गेला आणि ती धावत्या बसमधून रस्त्यावर कोसळली.त्याच वेळेस बाजूने जाणाऱ्या स्कूल बसचे चाक तिच्या अंगावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली.अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ तिला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.मात्र,डॉक्टरांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले.अचानक घडलेल्या प्रसंगाने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

जोरदार पावसाचा फटका; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता.. – वैनगंगा नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानासह अन्य खरीप पिकांच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.अशा परिस्थितीत काल रविवारी झालेला पाऊस पिकांसाठी...

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!