Monday, August 31, 2026
Homeपुणेमहिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. - ३ लाख रुपये...

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा ‘बी’ फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून तडजोडी अंती ३ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना दिघी पोलिस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)पथकाने रंगेहाथ अटक केली. चैताली बाळासाहेब गपाट,वय ३५ वर्षे,पद-पोलीस उपनिरीक्षक(वर्ग-२)रा.ग्रँड बे सोसायटी मांजरी,पुणे असे लाचखोर महिला पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,प्रकरणातील तक्रारदार ४२ वर्षीय पुरुष असून यांचेविरुद्ध दिघी पोलिस स्टेशन, पिंपरी चिंचवड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक चैताली गपाट ह्या त्या गुन्ह्याच्या तपास अधिकारी आहेत.चैताली गपाट यांनी सदरचा गुन्हा ‘बी’ फायनल करण्यासाठी गुन्ह्यात मदत केली व पुढे भविष्यात मदत करण्यासाठी यातील तक्रारदाराकडून ८ लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मंगळवार १४ जुलै २०२६ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)पुणे येथे तक्रार नोंदवली.प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दुसऱ्याच दिवशी म्हणजेच काल,बुधवार १५ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता पोलीस उपनिरीक्षक चैताली गपाट यांनी तक्रारदार यांच्याकडे तक्रादाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात ‘बी’ फायनल पाठविण्यासाठी तडजोडीअंती ३ लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.लाच मागणी निष्पन्न होताच सापळा कारवाई दरम्यान चैताली गपाट यांनी तक्रारदार यांचेकडून दिघी पोलीस ठाण्यात ३ लाख रुपये पंचासमक्ष स्वीकारले असता त्यांना सायंकाळी
पावणे सहा वाजे पोलीस ठाण्यात रंगेहात पकडण्यात आले.प्रकरणी आरोपी चैताली गपाट यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड आयुक्तालय,पुणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,ला.प्र.वि.पुणे परिक्षेत्र,पुणे व अप्पर पोलीस अधीक्षक अजीत पाटील,ला.प्र.वि.पुणे,अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले,ला.प्र.वि.पुणे,यांचे मार्गदर्शनाखाली सुहास हट्टेकर,पोलीस निरीक्षक, लाप्रवि,पुणे(मो.क्र. 9881873330),मिथुन म्हात्रे,पोलीस निरीक्षक, लाप्रवि,पुणे (मो.क्र.9637577154)यांचेसह पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
लोकसेवक शासकीय अधिकारी,कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम(एजंट)हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन शिरीष सरदेशपांडे,पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे (मो.क्र.9823167154)तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अजीत पाटील,ला.प्र.वि., पुणे (मो.क्र. 9029030530)यांनी केले आहे.
1) ॲन्टी करप्शन ब्युरो,पुणे दुरध्वनी क्रमांक 020-26122134, 26132802, 26050423, 9403781064
2) व्हॉट्स ॲप क्रमांक 9403781064(पुणे), 9930997700(मुंबई)
3) ई-मेलआयडी पुणे- dyspacbpune@mahapolice.gov.in
4) वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in
5) ऑनलाईन ॲप तक्रार- www.acbmaharashtra.net.i
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!