- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार केले जातेय,तर कुठे गैरवर्तन केलाच्या गंभीर घटना विविध ठिकाणी उघडकीस येऊ लागल्या आहेत.विशेष म्हणजे,पालक वर्ग पोटाची खळगी भरणार की,विकृत मानसिकतेचा कळस भरलेल्यांवर नजरा ठेवणार? यांवर आळा घालणार कोण?असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून सोडतो आहे.जोपर्यंत नराधमांच्या मानसिकतेत बदल होणार नाही; तोपर्यंत असेच चित्र राहणार की काय?असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.नुकतेच दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. शुक्रवारच्या सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास अवघ्या नऊ वर्षाची चिमुकली दळण दळणाऱ्या चक्कीकडे सायकलने एकटीच गेली असता २५ वर्षीय आरोपी गोपाल गिरीपुंजे या तरुणाने तिला पैशाचे आमिष देऊन आत बोलावले.एकटी असण्याचा फायदा घेत आरोपीने तिला दुसऱ्या चक्कीकडे नेले व तिच्याशी गैरवर्तन केले.चिमुकली कशी-बशी सुटका करून घरी परतली व घडलेल्या प्रकाराबाबत तिने आपल्या आईला सांगितले.घटनेनंतर चिमुकलीच्या आईने मोहाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी रात्री उशिरा चीमुकलिशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पाचगाव येथील २५ वर्षीय तरुण गोपाल गिरीपुंजे याचेवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७५(२)तसेच पोक्सोच्या बाल लैंगिक अपराध संरक्षण कायद्यान्वये कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदविला व पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
- Advertisement -

