Sunday, July 19, 2026
Homeभंडाराअन् क्षणात कुटूंबात पसरली स्मशान शांतता .. - सासरी गेलेल्या चुलत बहिणीने...

अन् क्षणात कुटूंबात पसरली स्मशान शांतता .. – सासरी गेलेल्या चुलत बहिणीने ओल्याच मेहंदीने परत येऊन बहिणीच्या तिरडीला दिला खांदा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-मन्न सुन्न करणारी घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात काल,बुधवारी २१ मे रोजी घडली. चुलत बहिणीचा लग्न सोहळा आटोपून तिरोडा येथे कर्तव्यावर जात असलेल्या तरुणीच्या दुचाकीला काळाने झडप घालून ट्रकने चिरडले.त्यात शारदा दामोधर पुंडे वय २६ वर्षे,रा.नवेगाव (धुसाळा), ता.मोहाडी,जि.भंडारा हिचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कुटूंबियांना होताच आनंदावर क्षणात विर्जन पडून शोककळा पसरली.मृतक शारदा ही मागील वर्षीच स्पर्धा परीक्षा देऊन तिरोडा येथे पाटबंधारे विभागात रुजू झाली होती.तीन दिवसाअगोदर तिच्या चुलत बहिणीचे नवेगाव येथे लग्न सोहळा असल्याने ती गावी परतली होती.पुंडे कुटूंबात आनंदाचे वातावरण होते.मंगळवारी २० मे रोजी मोठ्या हर्षोल्हात चुलत बहिणीचा लग्न सोहळा पार पडला.सायंकाळी चुलत बहिणीला सासरी पाठविण्यात आले.सर्वत्र आनंदाचे वातावरण असतांना नियतीच्या मनात कोणता डाव होता,हे कळलेच नाही.काल,बुधवारी २१ मे रोजी सकाळी २६ वर्षीय शारदा दामोधर पुंडे ही कर्तव्यावर जाण्यासाठी आपल्या दुचाकी क्रमांक-एमएच ४९ बीजी ७६४५ या दुचाकीने गावाहून निघाली.मात्र तुमसर-तिरोडा मार्गावरील सरांडी येथे तिचेवर काळाने झडप घातली. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने तिला चिरडले.त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.तर अपघातग्रस्त त्याच ट्रकने एका म्हशीला जबर धडक दिली.त्यात म्हशीचा सुद्धा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती कुटूंबियांना होताच कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला.घटनेने कुटूंबात स्मशान शांतता पसरली,सासरी गेलेल्या चुलत बहिणीने ओल्याच मेहंदीने परत येऊन बहिणीच्या तिरडीला खांदा दिला.अखेर शवविच्छेदनानंतर मृतक तरुणीच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडला.यावेळी उपस्थितांचे डोळे पानावले होते.तिरोडा पोलिसांनी ट्रक व चालक यांना ताब्यात घेतले.मृतक शारदा हिचे दोन्ही भाऊ नोकरीवर आहेत.एक भाऊ पोलीस उपनिरीक्षक तर दुसरा भाऊ सैन्यात आहे.तर एक बहिण पोलीस उपनिरीक्षक व दुसरी बहिण वनविभागात कार्यरत आहे.तर शारदा ही दहा महिन्याअगोदर स्पर्धा परिक्षेतून पाटबंधारे विभागात नियुक्ती होऊन तिरोडा येथे कार्यरत होती.तिच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली असून पानावलेल्या डोळ्यांनी तिला अखेरचा निरोप दिला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

व्हॉट्सॲपवरील ‘एपीके’ फाइलने केला घात; दहा लाखाला गंडा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका निवृत्त कर्मचाऱ्याला मोबाईल व्हॉट्सॲपवर पाठवलेली बनावट 'एपीके' फाइल उघडणे चांगलेच महागात पडले आहे.फाईल उघडताच सायबर चोरट्यांनी मोबाईल हॅक करून त्यांच्या...

चीमुकलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या वृद्धाला अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती पोलिस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक व किळसवाणा प्रकार समोर आला आहे.परिसरातील इतर मुलांसोबत खेळत असलेल्या एका ४ वर्षीय चीमुकलिशी...

पोलिसांनी पकडले सुगंधीत तंबाखूचे मोठे १० पोते..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-सध्याच्या घडीला राज्याच्या विविध भागात अवैध सुगंधित तंबाखू,गुटखा व इतर मादक पदार्थ विक्री तथा त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू असतांनाच...

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या समान निधी(Matching Schemes)व असमान निधी(Non-Matching Schemes)योजनांद्वारे राज्यातील शासनमान्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!