Wednesday, April 15, 2026
Homeचंद्रपूरबालसुधारगृहातून अल्पवयीन मुलीचे पलायन..

बालसुधारगृहातून अल्पवयीन मुलीचे पलायन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-आजची तरुणाई चित्रपटांतील कथानकांच्या पाऊलावर पाऊल ठेवत प्रत्यक्ष कृती करू पाहतात. मात्र,चित्रपट व प्रत्यक्ष जीवनात जमीन अस्मानाचा फरक आहे.चित्रपटातील कथानक चांगल्या गोष्टी शिकवतात. पण काहीजण चांगल्या गोष्टी सोडून वाम मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत असतात.कमी वयात गुन्हेगारी प्रवृत्तींकडे वळलेल्या अल्पवयीनांना बालसुधारगृहात ठेवण्यात येते.त्यातच चंद्रपूरच्या रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बालगृहातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने तेथील कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवून पळून गेल्याची घटना नुकतीच घडली आहे.पळून जाणारी मुलगी अल्पवयीन असल्याने नाव जाहीर करण्यावर न्यायालयाने निर्बंध घातलेले आहे. घटनेच्या दिवसांपासून मुलीचा शोध घेण्यात येत आहे.
माहितीनुसार,चंद्रपूर येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार १६ वर्षीय मुलीला सरकारी मुलींच्या निरीक्षण गृहात म्हणजेच बालगृहात ठेवण्यात आले. सोमवारी १९ मे च्या रात्री साडेआठ वाजता या मुलीने संस्थेत उपस्थित असलेल्या इतर मुली आणि कर्मचाऱ्यांवर खुर्चा फेकून गोंधळ घातला आणि एका कर्मचाऱ्यावर काचेने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी धमकावल्यानंतर ती संस्थेतून बाहेर पडली. संस्थेच्या कर्मचाऱ्याने तिचा पाठलाग केला,तेव्हा मुलीने त्याच्यावर दगडफेक करून त्याला जखमी करण्याचा प्रयत्न केला आणि अंधाराचा फायदा घेत ती मुलगी पळून गेली.या घटनेबाबत सरकारी बालिका निरीक्षण गृहाच्या अधीक्षकांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पळून जाणाऱ्या मुलीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!