Thursday, July 9, 2026
Homeचंद्रपूरशेतकऱ्यांचा एसडीओ कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न..

शेतकऱ्यांचा एसडीओ कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील माणिकगड सिमेंट म्हणजेच अल्ट्राटेक कंपनीच्या चुनखडी क्षेत्रासाठी शेतजमिनी देऊनही योग्य मोबदला न मिळाल्याने कुसुंबी येथील पाच आदिवासी शेतकऱ्यांनी आज,सोमवार १३ एप्रिल रोजी राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातच(एसडीओ)विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे,गेल्या १५ वर्षांपासून जमीन मोबदल्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने कोलाम बांधवांच्या संयमांचा बांध फुटला.राजुरा उमविभाअंतर्गत येणाऱ्या कोरपना तालुक्यातील कुसुंबी येथील कोलाम कुटुंबाच्या जमिनी माणिकगड सिमेंट कंपनीने आपल्या चुनखडी प्रकल्पासाठी अधिग्रहीत केल्या होत्या.मात्र या जमिनिंचा योग्य मोबदला अद्यापही मिळालेला नाही.एकतर मोबादला द्या किंवा आमच्या जमिनी परत करा,या मागणीसाठी हे आदिवासी शेतकरी गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आज टोकाचे पाऊल उचलले. पाचही शेतकरी राजुरा उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्या कार्यालयात आपली व्यथा घेऊन गेले होते.तिथेच त्यांनी विष प्राशन केले. सदरचा प्रकार लक्षात येताच कार्यालयात मोठी खळबळ उडाली.राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाचही जणांना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र,त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.सदरच्या घटनेवरून प्रशासन शेतकऱ्यांप्रति किती संवेदनशील आहे; हे लक्षात येते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी...

संशय आल्याने दहा हजार घेण्यास नकार; पण तरीही गुन्हा दाखल.. -पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दाखल गुन्ह्यातील गुन्ह्याचे स्वरूप कमी करून तपासात मदत करण्याच्या नावाखाली दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या एका पोलीस हवालदारावर भंडारा...

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!