Monday, July 20, 2026
Homeचंद्रपूर१४ वर्षीय तरुणी व २५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; ब्रम्हपुरी तालुक्यातील...

१४ वर्षीय तरुणी व २५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका टॉवरवर १४ वर्षीय तरुणी व २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रविवारी २ मार्चला ब्रम्हपुरी तालुक्याच्या उचली गाव परिसरात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.गायत्री उर्फ सोनी अनिल गणवीर वय १४ वर्षे,रा.चांदली व रोहित रमेश लिंगायत वय २५ वर्षे,रा.उचली,ता.ब्रम्हपुरी असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
माहितीनुसार,गायत्री व रोहित यांचे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.प्रेम संबंध असतांनाच काल रविवारी रोहितचे गाव असलेल्या उचली येथील टॉवरवर दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शंका-कुशंकेला वाचा फुटली आहे.अशातच घटनास्थळावर दुचाकी आढळून आल्याने गळफास लावण्यासाठी त्यांनी दुचाकीचा आधार घेतला असावा, असा कयास बांधला जात आहे.त्यामुळे दोघांनीही प्रेम संबंधातून आत्महत्या केली की,कोणी मारून फासावर लटकवले? हे अनुत्तरित असले तरीही पोलीस तपासात उघड होणार आहे.घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

९० किलो प्रतिबंधित तंबाखूसह ७ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका चारचाकी वाहनाने मध्य प्रदेशच्या पांढुर्णा येथून सावनेर मार्गे नागपूरच्या दिशेने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या सावनेर तालुक्याच्या केळवद पोलिसांनी...

शाखा अभियंत्याच्या निलंबनानंतर आता ग्रामसेवक निलंबित.. – गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कारवाईचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मनमानीचा कारभार करू पाहणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्याने जिल्हा...

विविध गावात दहशत माजवणारी वाघीण जेरबंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील विविध गावात दहशत माजवणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागास यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.विशेष म्हणजे,वाघिणीने समुद्रपूर तालुक्याच्या पिंपळगाव,उंदीरगाव,साखरा,...

अखेर उद्या होणारा डॉक्टरांचा राज्यव्यापी संप मागे; आरोग्य सेवा राहणार सुरळीत..

उद्रेक न्युज वृत्त :-ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA) महाराष्ट्र राज्य शाखेने राज्यव्यापी बंदची घोषणा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!