Tuesday, July 21, 2026
Homeगोंदियावीज वितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ कार्यालयातच नशेत झिंगाट; गुन्हा दाखल..

वीज वितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ कार्यालयातच नशेत झिंगाट; गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-दारूच्या नशेत धुंद असलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञाने कार्यालयातच धिंगाणा घालून ग्राहकांना अपशब्दांचा वापर केल्याचा प्रकार सडक-अर्जुनी येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घडून आला.प्रकरणी धिंगाणा घालणाऱ्या
कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश बिसन प्रधान वय ४० वर्षे हा दि. २८ फेब्रुवारी रोजी दारूच्या नशेत झिंगाट होता व त्यातूनच त्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धिंगाणा घातला.एवढेच नव्हे तर तो कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांना अपशब्दात बोलत होता.विशेष म्हणजे,तो नेहमी दारूच्या नशेत येत असल्याने त्याच्यावर विभागीय कारवाई प्रस्तावित आहे.
तरी तो नेहमीच कार्यालयात मद्यप्राशन करायचा व  कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांशी अशभ्य वर्तन करीत होता.यातच त्याने दि.२८ फेब्रुवारी रोजीही तेच कृत्य केले.प्रकरणी ३४ वर्षीय सहाय्यक अभियंता विनोद विजय सोनकुवर यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी आरोपी वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश प्रधान याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.त्याची वैद्यकीय चाचणी करून नमुने घेण्यात आले आहेत.पुढील तपास पोलिस हवालदार खोटेले करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!