Wednesday, September 9, 2026
Homeदेसाईगंजकोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यांच्या दालनात बांधकाम कामगार मंडळामार्फत राबविण्यात योजना,तसेच लाभार्थी नोंदणी संदर्भात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
बैठकीत आमदार मसराम यांनी बांधकाम क्षेत्रातील पात्र कामगारांची १०० टक्के नोंदणी करून त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. बांधकाम क्षेत्रात किमान ९० दिवस काम केलेल्या प्रत्येक पात्र कामगारांची ऑनलाइन नोंदणी करून त्यांना शिक्षण,आरोग्य,प्रसूती सहाय्य,सुरक्षा साहित्य,घरकुल, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य,विवाह सहाय्य, पेन्शन,अपघात विमा तसेच मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर सर्व योजनांचा लाभ मिळेल,यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत,असे त्यांनी सांगितले.
यावेळी दगड फोडणे व कापणे,लादी-टाईल्स कापणे व पॉलिश करणे,सुतारकाम,रंगकाम,गटार व नळजोडणी, विद्युत वायरिंग,अग्निशमन व वातानुकूलित यंत्रणा बसविणे,लिफ्ट व स्वयंचलित जिने,सुरक्षा दरवाजे, लोखंडी ग्रिल,जलसंचयन संरचना,अंतर्गत सजावटीची कामे,काचकाम,सौर उपकरणे,मॉड्युलर किचन,सिमेंट काँक्रिट वस्तू,जलतरण तलाव,सार्वजनिक उद्याने,पदपथ, बसथांबे,रोटरी,कारंजे तसेच इमारत व पायाभूत सुविधांशी संबंधित विविध कामांमध्ये कार्यरत असलेले कामगार मंडळाच्या योजनांसाठी पात्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रसंगी आमदार मसराम यांनी शासकीय बांधकाम अधिकारी कुलदीप भोलाने यांना जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती करून कामगारांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवावी.नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करून पात्र कामगारांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून द्यावा.कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहणार नाही,याची संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी,असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस देसाईगंज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविंद्र भाबड,कोरचीचे गटविकास अधिकारी  राजेश फाये,कुरखेडाचे गटविकास अधिकारी धीरज पाटील,आरमोरीचे गटविकास अधिकारी मंगेश आरेवार, सरकारी बांधकाम विभागाचे लिपिक कांबळे,परशुराम ठाकरे,तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने देसाईगंज,आरमोरी, कुरखेडा व कोरची तालुक्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.बैठकीत बांधकाम कामगारांच्या नोंदणीचा आढावा घेऊन विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!