- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
१० सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० ते १२ वाजता गडचिरोली येथील सफाई कर्मचारी संघटनांसोबत विश्रामगृह येथे भेट.दुपारी १२ ते १ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगांराच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे बाबतच्या अधिनियम २०१३ ची अंमलबजावणी बाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी निवारणाकरीता केलेल्या उपाययोजना यासंदर्भात आढावा बैठक.आढावा बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद.दुपारी १ ते २ पर्यंत राखीव व दुपारी २ वाजे नंतर गडचिरोली येथुन नागपुरकडे रवाना.
- Advertisement -

