Sunday, October 25, 2026
Homeसिंदेवाहीवाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी घडली.नानाजी नारायण कामडी वय ५३ वर्षे, रा.पळसगाव जाट,ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून नानाजी कामडी हे आपल्या शेतात तिळाच्या पेंड्या बांधण्याचे काम करीत होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांनी कापलेल्या तिळाच्या काही पेंड्या घरी नेल्या व परत  शेताकडे गेले.सायंकाळ होऊनही ते घरी परतले नसल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला.दरम्यान,सायंकाळच्या सुमारास शेतात त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.शरीरावरील जखमांवरून त्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाले.घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!