Thursday, October 15, 2026
Homeसिंदेवाहीबस-ट्रकची समोरासमोर धडक; तब्बल २४ प्रवासी जखमी..

बस-ट्रकची समोरासमोर धडक; तब्बल २४ प्रवासी जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही तालुक्यातील मौजा पळसगाव(जाट)येथील तुकूम बोकडडोह नाल्याजवळ गुरुवारच्या सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली.या अपघातात तब्बल २४ प्रवासी जखमी झाले.यातील ६ जणांची प्रकृती गंभीर असून १८ जण किरकोळ जखमी झालेत.
एमएच-१४ एमएच-३३५६ क्रमांकाची एसटी बस सिंदेवाहीहून राजुरा-तुमसर मार्गावर निघाली असतांना
एमएच-४० डीएल-३२७३ क्रमांकाचा नागपूरकडून येणारा काळी गिट्टीने भरलेला ट्रक यांच्यात पळसगाव जाट नजिकच्या नाल्याजवळ समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहने धाडकन धडकताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली.धडक इतकी भीषण होती की बस आणि ट्रकचा समोरील भाग चक्काचूर झाला.अपघातात जीवितहानी झाली नसली तरीही अनेकजण अपघातात जखमी झाल्याने स्थानिकांना मोठी धावाधाव करावी लागली.अपघाताची माहिती मिळताच पोलिस प्रशासन,परिसरातील नागरिक आणि मदत पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले.सर्व जखमींना सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.तर ६ जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!