Sunday, August 16, 2026
Homeसिंदेवाहीअन् महिलांनी सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांना डांबले कार्यालयातच…-ग्रामपंचायत कार्यालयाची होती मासिक बैठक सुरू

अन् महिलांनी सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांना डांबले कार्यालयातच…-ग्रामपंचायत कार्यालयाची होती मासिक बैठक सुरू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

सिंदेवाही(चंद्रपूर) :- सिंदेवाही तालुक्यातील ग्रामपंचायत खातगाव येथील महिलांनी सरपंचासह सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंबल्याची घटना काल,सोमवारी सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास घडली.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर आहे.खातगावात पाण्याची मारामार असल्याने महिलांचा रोष होता.त्यामुळे  खातगाव ग्रामपंचायत कार्यालयाची मासिक बैठक घेण्यात आली.बैठक चालू असताना गावातील विशिष्ट गटातील महिलांनी अचानक ग्रामपंचायत कार्यालयावर जमाव करून कार्यालयाचे द्वार बंद केले. त्यामुळे कार्यालयात असलेले गावातील सरपंच मेघश्याम सिडाम,सदस्य सुरेखा नैताम,प्रेमिला चहांदे, रेखा नेवारे,तसेच चपराशी हिवराज डोंगरवार आणि संगणक चालक नागदेवते हे ग्रामपंचायत कार्यालयात आत सापडले.गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवलेल्या सदस्यांना शिवीगाळ करीत पाणीपुरवठा सुरू करा; असे ओरडून दबाव आणून कार्यालयाला कडी लावली.घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक सागर महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पोलिस वाहनाने तात्काळ खातगाव येथे पोहोचले असता काही महिलांनी परिसरातून काढता पाय घेतला.त्यानंतर पोलिसांनी महिलांची समजूत काढल्यानंतर सरपंच, सदस्य व कर्मचारी यांना कार्यालयाबाहेर काढले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस विभागात खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाने संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाने(एपीआय) पीसीएमटीच्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची...

गडचिरोलीतील रस्त्यांसाठी सुमारे २ हजार ६०० कोटींचा भरीव निधी; पायाभूत सुविधांच्या विकासाला गती.. – पोलीस जवानांचे योगदान अविस्मरणीय- ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासोबत जिल्ह्याचा समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपत स्थानिकांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर...

उद्याला राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे गृह(ग्रामीण),गृहनिर्माण, शालेय शिक्षण,सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे उद्या,रविवार १६ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात...

ऐन स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात; तीन शालेय विद्यार्थिनींचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या हिंगणघाट शहरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.एकीकडे स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा केला जात असतांनाच तीन शालेय विद्यार्थिनींचा भीषण अपघात मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!