Monday, September 21, 2026
Homeसिंदेवाहीसिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तसेच सहसचिवपदी पठाण यांची,तर कोषाध्यक्षपदी अनिल एलकेवार यांची निवड करण्यात आली.कार्यकारिणी सदस्य म्हणून जितेंद्र बिलोरकर,शशिकांत बतकमवार, राकेश बोरकुंडवार,अमृत दंडवते आणि मंगेश पुट्टावार, कपिल मेश्राम यांचा समावेश आहे.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून सिंदेवाही तालुक्यातील विविध सामाजिक,शैक्षणिक,कृषी, प्रशासकीय तसेच जनहिताच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासोबतच पत्रकारिता क्षेत्रातील बांधिलकी अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत गेडाम हे ‘तरुण भारत’चे सिंदेवाही तालुका प्रतिनिधी असून,तालुक्यातील विविध घडामोडींना वृत्तपत्रीय माध्यमातून सातत्याने प्रसिद्धी देण्याचे कार्य ते करीत आहेत.
विशेष म्हणजे,प्रेस क्लब सिंदेवाहीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीतील सर्व सदस्य हे दैनिक वृत्तपत्रांचे अधिकृत प्रतिनिधी असून,कार्यकारिणीत डिजिटल मीडिया प्रतिनिधीचा समावेश नाही.त्यामुळे पारंपरिक वृत्तपत्रीय पत्रकारितेची व्यावसायिक ओळख आणि प्रतिष्ठा जपणारी ही कार्यकारिणी ठरली आहे.
नवीन कार्यकारिणीचे पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून,तालुक्यातील पत्रकारिता अधिक सक्षम, निर्भीड आणि लोकाभिमुख होण्यासाठी नव्या कार्यकारिणीकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!