Thursday, October 1, 2026
Homeसिंदेवाहीसिंदेवाहीत रानभाजी महोत्सव; शंभर महिला बचत गटांचे विविध रानभाज्यांचे स्टॉल..

सिंदेवाहीत रानभाजी महोत्सव; शंभर महिला बचत गटांचे विविध रानभाज्यांचे स्टॉल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-आदिवासी दिनानिमित्त कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ९ ते १५ ऑगस्टदरम्यान रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.याच उपक्रमांतर्गत आज,शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी तहसील कार्यालय परिसर, सिंदेवाही येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महोत्सवाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य  रमाकांत लोधे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून  झाडे तहसीलदार सिंदेवाही तसेच कल्याणी औटी,तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही यांची प्रमुख उपस्थिती होती.
या रानभाजी महोत्सवात तालुक्यातील जवळपास १०० महिला बचत गटांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे आकर्षक स्टॉल उभारले होते.पावसाळी हंगामात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्यांची नागरिकांना ओळख व्हावी,त्यांचे पौष्टिक व औषधी महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे तसेच महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी,हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश होता.
रानभाज्या या प्रामुख्याने पावसाळ्यातच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने महोत्सवाच्या माध्यमातून शहरी नागरिकांना विविध रानभाज्यांची माहिती प्रत्यक्ष मिळाली.विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल,त्यांची माहिती आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.या महोत्सवाला जवळपास एक हजार नागरिकांनी भेट देत रानभाज्यांची माहिती जाणून घेतली.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जे.व्ही.कावळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक(आत्मा)सिंदेवाही, बोलीवर उपकृषी अधिकारी,बारापात्रे उपकृषी अधिकारी,ज्योती चिडे उपकृषी अधिकारी सिंदेवाही,कराडे,कोवले,गाडगे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
रानभाज्यांच्या माध्यमातून पारंपरिक आहारपद्धती, नैसर्गिक शेती व स्थानिक जैवविविधतेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणारा हा महोत्सव ठरला. महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच स्थानिक रानभाज्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उपविभागीय अभियंता बाळू षटगोपनवार यांचा निरोप समारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंदेवाहीचे उपविभागीय अभियंता बाळू जगन्नाथ षटगोपनवार यांच्या सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ आज गुरुवारी उत्साहात पार पडला.यावेळी षटगोपनवार यांचा...

गडचिरोलीत गर्भाशयमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी एचपीव्ही लसीकरण; १ हजार २५४ किशोरवयीन मुलींना दिली लस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी गडचिरोली जिल्ह्यात शंभर टक्के एचपीव्ही लसीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आदिवासी व...

आजपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या ‘या’ प्रवाशांना एक ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा कडक निर्णय घेत 'आरक्षित' केलेल्या तिकिटांवर किंवा 'ई-पास'वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज,गुरुवार १ ऑक्टोंबरपासून...

महिन्याची सुरुवात गॅस सिलेंडरच्या दरवाढीने..!

उद्रेक न्युज वृत्त :-सरकारी तेल विपणन कंपन्यांनी महिन्याच्या सुरुवातीलाच व्यवसायिक ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.आज,गुरुवार १ ऑक्टोंबरच्या सकाळीच सरकारी तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!