- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
वर्धा :-जिल्ह्याच्या हिंगणघाट शहरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.एकीकडे स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा केला जात असतांनाच तीन शालेय विद्यार्थिनींचा भीषण अपघात मृत्यू झाला.सदरची घटना आज,शनिवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊच्या दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेजवळ घडली. हिंगणघाट शहरातील आंबेडकर शाळेजवळ एका भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला.समृद्धी रुपक धामसे वय १५ वर्षे,रा.संत गोमाजी वॉर्ड,हिंगणघाट,आरुही राजू चवरे वय १७ वर्षे आणि मिसबा जावेद शेख वय १७ वर्षे,रा.संत चोखोबा वॉर्ड,हिंगणघाट,जि.वर्धा अशी अपघातात मृत पावलेल्या मुलींची नावे आहेत.
आज सकाळच्या सुमारास समृद्धी धामसे,आरुही चवरे आणि मिसबा शेख या तिन्ही मुली ॲक्टिवा दुचाकीवरून स्वातंत्र्यदिनासाठी जात होत्या. त्याचवेळी आंबेडकर शाळेजवळ मागून येणाऱ्या हंश नामक भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,धडक बसताच तिन्ही मुली रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या.स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून जखमी मुलींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र, तिन्ही शालेय मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला.स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहातच तीन चिमुकल्या मुलींचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच हिंगणघाट शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
- Advertisement -

