Thursday, October 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर उद्या होणारा व्यापारी संघटनांचा 'नो यूपीआय डे' मागे..!

अखेर उद्या होणारा व्यापारी संघटनांचा ‘नो यूपीआय डे’ मागे..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-यूपीआय व्यवहारांवर मर्चेंट डिस्काउंट रेट(MDR)लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या प्रस्तावित निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी ‘ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशन'(एआयएमआरए)या व्यापारी संघटनेने उद्या,शुक्रवार २ ऑक्टोंबर रोजी देशभरात ‘नो यूपीआय डे’ पाळण्याचे मोठे आवाहन केले होते.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून २ ऑक्टोंबर रोजी राज्यभरासह देशभरातील मोबाईल विक्रेते आपला निषेध नोंदवणार होते.या दिवशी ग्राहकांना फक्त रोख म्हणजेच कॅश किंवा कार्डद्वारे व्यवहार करण्याचे आवाहन केले होते.मात्र,केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत व्यापारी प्रतिनिधींची बैठक झाल्यानंतर उद्या होणारा ‘नो यूपीआय डे’चा प्रस्तावित निषेध मागे घेण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला आहे.राजधानी दिल्लीतील चांदणी चौकचे खासदार आणि कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली सुमारे वीस वरिष्ठ व्यापारी आणि किरकोळ विक्रेता प्रतिनिधींनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.या बैठकीत प्रस्तावित यूपीआय एमडीआर मुळे लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांवर होणाऱ्या संभाव्य आर्थिक परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. व्यापारी प्रतिनिधींनी या शुल्काबाबत सरकारसमोर विविध सूचना आणि मागण्या मांडल्या.व्यापारी संघटनांच्या अडचणी व सूचनांचा सरकारकडून विचार केला जाईल,असे आश्वासन देण्यात आल्याने ‘नो यूपीआय डे’ निषेध मागे घेण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उपविभागीय अभियंता बाळू षटगोपनवार यांचा निरोप समारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंदेवाहीचे उपविभागीय अभियंता बाळू जगन्नाथ षटगोपनवार यांच्या सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ आज गुरुवारी उत्साहात पार पडला.यावेळी षटगोपनवार यांचा...

गडचिरोलीत गर्भाशयमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी एचपीव्ही लसीकरण; १ हजार २५४ किशोरवयीन मुलींना दिली लस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी गडचिरोली जिल्ह्यात शंभर टक्के एचपीव्ही लसीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आदिवासी व...

आजपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या ‘या’ प्रवाशांना एक ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा कडक निर्णय घेत 'आरक्षित' केलेल्या तिकिटांवर किंवा 'ई-पास'वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज,गुरुवार १ ऑक्टोंबरपासून...

महिन्याची सुरुवात गॅस सिलेंडरच्या दरवाढीने..!

उद्रेक न्युज वृत्त :-सरकारी तेल विपणन कंपन्यांनी महिन्याच्या सुरुवातीलाच व्यवसायिक ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.आज,गुरुवार १ ऑक्टोंबरच्या सकाळीच सरकारी तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!