Wednesday, September 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क माफ..

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क माफ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.  दुष्काळग्रस्त भागामध्ये येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश मिळेपर्यंत परीक्षा शुल्क आकारू नये,असे आदेश राज्य मंडळाचे सचिव डॉ.दिपक माळी यांनी दिले.राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे २६५ तालुक्यांमध्ये विशेष बाब म्हणून उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा होणार आहे.ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.सरकारच्या निर्णयानुसार फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यातील सर्व शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना याबाबत तात्काळ सूचना देण्यात याव्यात आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळास तातडीने सादर करावा,असा आदेश राज्य मंडळाने दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून बस प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीचा प्रवास करण्यासाठी महामंडळाने 'एनसीएमसी' कार्ड अनिवार्य केले आहे.प्रवाशांना नानाविध सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी राज्य मार्ग...

अवैध रेतीची वाहतूक; दोन हायवा ट्रक जप्त..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या जुनोना परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर पोलिसांनी धडक कारवाई केली.या कारवाईत हायवा चालक सुमित संतोष टेंभूर्णे वय...

अखेर जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सजगतेने प्रलयकारी पुरावर मात..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान इंद्रावती उपखोऱ्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला गेले चार दिवस भीषण पुराचा वेढा पडला...

मंत्रिमंडळ बैठकीतील दहा मोठे निर्णय; माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत आरक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्री मंडळाची बैठक आज,मंगळवार २९ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!