- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे शेतीचे नुकसान होतांना दिसून येते.अश्यातच यंदा अल्प पर्जन्यमान व पावसाच्या खंडामुळे महाराष्ट्र राज्यावर कोरडा दुष्काळाचे संकट आहे.अशा परिस्थितीत राज्यातील शेतकरी बांधवांसमोर निर्माण होणाऱ्या संभाव्य संकटाच्या काळात त्यांना मदतीचा हात देण्याच्या सामाजिक भावनेतून कृषी विभागात कार्यरत एकूण १८ हजार ६२२ पदांपैकी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ, पुणे तसेच महासंघातील संलग्न सर्व तांत्रिक अधिकारी व कर्मचारी संघटनांमध्ये असलेल्या तांत्रिक संवर्गातील एकूण १४ हजार ४४५ अधिकारी व कर्मचारी यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ, पुणेचे अध्यक्ष बाबासाहेब जेजुरकर यांनी पत्र पाठवले आहे.
शेतकरी हा आमच्या कार्याचा केंद्रबिंदू असून, संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आमची सामाजिक बांधिलकी आहे.त्यामुळे कृषी विभागातील सर्व तांत्रिक अधिकारी व कर्मचारी संघटनांनी स्वेच्छेने या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्याचा निर्धार केला आहे.त्यानुसार सप्टेंबर २०२६ महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन स्वेच्छेने कपात करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात यावे,यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही व संबंधितांना निर्देश देण्यात यावेत,असे महासंघाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे,अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात कोरड्या दुष्काळाचे संकट गडद झाले आहे. पावसाअभावी जलाशयही फुल्ल झालेले नाही.तर उभे पिके करपत आहेत.अल्प पर्जन्यमान व पावसाच्या खंडामुळे यंदा उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शिवाय हवालदिल शेतकऱ्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसांचे वेतन दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
- Advertisement -

