Sunday, September 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे.त्यामुळे,उत्पादक शेतकरी बांधवांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.सदरची अडचण लक्षात घेता आता शेतकऱ्यांना स्वतःच मोबाईल ॲपवरून आपल्या शेतातील ई-पीक पाहणी करता येणार आहे.ई-पीक पाहणीचे काम अधिक जलद,सुलभ व पारदर्शक पद्धतीने तसेच शेतकऱ्यांच्या सोयीचे होण्यासाठी डीसीएस एमएच मोबाईल ॲपमध्ये शेतकरी स्तरावरून पीक नोंदणी करण्याची सुविधा ११ सप्टेंबर २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे या सुविधेअंतर्गत आता शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून डीसीएस एमएच मोबाईल ॲपमध्ये आपला शेतकरी ओळख क्रमांक व  फार्मर आयडी प्रविष्ट करून शेतातील पिकांची नोंदणी करू शकतील.विशेष म्हणजे,ई-पीक नोंदणीची माहिती विविध शासकीय योजना,अनुदान व इतर शासकीय सेवांचा लाभ देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी डीसीएस एमएच मोबाईल ॲपचा वापर करून शेतातील पिकांची नोंदणी करून शासकीय योजना लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात येत आहे.
  • मोबाईल ॲपद्वारे नोंदणी👇
गुगल प्ले स्टोअरवरून अधिकृत DCS MH/ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाउनलोड करा.
 ॲप सुरू करून तुमचा चालू मोबाईल नंबर टाका आणि प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.
 सात/बारा उताऱ्यावर दिलेल्या खात्यादाराचे नाव निवडा आणि योग्य महसूल विभाग(जिल्हा,तालुका, गाव)निवडा.
शेतात प्रत्यक्षात उभे राहून जीपीएस(GPS)सुरू ठेवा आणि पिकाचा स्पष्ट फोटो ॲपमध्ये अपलोड करा.
पिकाचे नाव,हंगाम आणि क्षेत्र अचूक भरून माहिती अंतिम सबमिट करा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

उद्याला गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाची खरीप शिवार फेरी.. – एकाच ठिकाणी २२८ पीक वाण व तंत्रज्ञान शिफारशींची प्रात्यक्षिके व शास्त्रज्ञांशी थेट संवादाची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६...

आता प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव.. – डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकणाऱ्या दुकानदारांना बसणार चाप..

उद्रेक न्युज वृत्त :-आता देशातील प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.विशेष म्हणजे,भारताच्या सर्वोच्च औषध सल्लागार संस्थेने देशभरातील प्रत्येक केमिस्ट...

अवैध दारू विक्रेत्यांना दणका; देसाईगंज आणि आरमोरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील दारू विक्रेते तडीपार.. -देसाईगंजच्या कुरूड गावातील दारू विक्रेतीचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दारुबंदी असतांनाही राजरोसपणे अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात खरी,पण काही वेळातच घरी पाठवले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!