Saturday, September 19, 2026
Homeभंडाराबोगस डॉक्टरांसाठी ग्रामपंचायत स्तरावरून मोहीम..

बोगस डॉक्टरांसाठी ग्रामपंचायत स्तरावरून मोहीम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्यात फोफावलेल्या अनधिकृत व बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिलेत. बोगस डॉक्टरांची माहिती गोळा करण्यासाठी आता ग्रामपंचायत स्तरावरून मोहीम राबवली जाणार आहे. पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट देऊन सरपंचांकडून माहिती घेतील आणि ती तालुका समितीमार्फत जिल्हा समितीकडे पाठवतील.तपासणीदरम्यान कोणताही डॉक्टर बोगस
आढळल्यास दिरंगाई न करता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा,असे निर्देश दिले.भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत नियमित लसीकरणासह विविध आरोग्य उपक्रमांचा आढावा घेण्यात आला,तसेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे कडक निर्देश देण्यात आले.त्याचबरोबर,बाल मृत्यू दर आणि कुपोषण रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे सांगत,जिल्ह्यातील प्रत्येक गावात लसीकरण सत्र आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले.जन्मानंतर पहिल्या चोवीस तासांच्या आत नवजात बाळाला हिपॅटायटिस-बी चा डोस मिळणे बंधनकारक असून, त्यापासून एकही बालक सुटणार नाही याची दक्षता क्षेत्रीय स्तरावर घ्यावी,असे स्पष्ट आदेश देण्यात आले.
बैठकीस जिल्हा परिषद आरोग्य सभापती आनंद मलेवार,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.सुजाता दुधगावकर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संदीप गजभिये,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, उपजिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पवार,अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तसेच विविध समित्यांचे पदाधिकारी व तालुकास्तरीय वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी; शेतीचे नुकसान..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात काल शुक्रवारच्या रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावून शेतकरी बांधवांना एकप्रकारे दिलासा दिला.तर काही ठिकाणी वेगवान वाऱ्याने...

शेतात उभे असतांना जवळच कोसळली वीज; पतीचा मृत्यू,तर पत्नी थोडक्यात बचावली..

उद्रेक न्युज वृत्त  उमरेड(नागपूर):-शेतात मिरचीच्या पिकाची डवरण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा जवळच कोसळलेल्या विजेमुळे मृत्यू झाला,तर पत्नी थोडक्यात बचावली.मात्र, जोडीतील एका बैलाला दुखापत झाल्याची घटना उमरेड...

आता गडचिरोली जिल्ह्यात मांगूर माशाचे मत्स्यपालन,प्रजनन,मत्स्यबीज संचयन,खरेदी-विक्री व वाहतुकीस प्रतिबंध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील मत्स्यपालक,मच्छिमार,मत्स्य सहकारी संस्था,मत्स्य शेतकरी,मत्स्यबीज विक्रेते,मासे विक्रेते तसेच नागरिकांनी प्रतिबंधित परदेशी मांगूर (वागुर)माशाचे पालन,संवर्धन,प्रजनन,मत्स्यबीज निर्मिती व संचयन तसेच खरेदी,विक्री,वाहतूक अथवा साठवणूक...

प्रवासी बस उलटली; सात प्रवासी गंभीर जखमी,तर ३१ प्रवाशांना किरकोळ दुखापत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवनीजवळ आज,शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली.बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून प्रवासी बस रस्त्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!