Friday, July 24, 2026
Homeभंडाराजिल्हाधिकारी असावे तर असे…..!-उपविभागीय अधिकाऱ्यांसह दोन तहसीलदारांनाही केले निलंबित..-आतापर्यंत १० च्या वर...

जिल्हाधिकारी असावे तर असे…..!-उपविभागीय अधिकाऱ्यांसह दोन तहसीलदारांनाही केले निलंबित..-आतापर्यंत १० च्या वर कर्मचाऱ्यांना केले निलंबित…नाहीतर ‘हे’….चोरघोडे….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी २२ नोव्हेंबर २०२२ रोजी भंडारा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वांना ठणकावून सांगितले की,कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही; असे सक्त आदेश त्यांनी रूजू होताच दिले होते.मात्र काहीजण ‘चलती का नाम गाडी’ असे करून आम्ही आमचे स्वतःच मालक असल्याचे भासवित असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अशांवर फटाके फोडले आहेत.त्यानुसार भंडारा खनिकर्म विभागात कार्यरत दोन कर्मचाऱ्यांनी गौण खनिजाची रॉयल्टी देण्याच्या कामात कसूर केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस देऊन निलंबित केले आहे.नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये विशाल गुल्हाने आणि उमेश बारापात्रे यांचा समावेश आहे.

तसेच कामात हयगय केल्याप्रकरणी आतापर्यंत १० च्या वर कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन निलंबनाची कारवाई झाली आहे.पोलिस पाटील भरती अनियमिततेप्रकरणी तत्कालीन भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यांसह दोन तहसीलदार निलंबित झाले होते. या अधिकाऱ्यांचे निलंबन कारवाई जिल्हाधिकारी यांच्या अहवालावरच झाली होती.आता हे दोन कर्मचारी निलंबित झाले असून या यादीत आणखी काही कर्मचाऱ्यांचा नंबर लागणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सर्वत्र सुरू आहे.यावरून असे लक्षात येते की,तुम्ही कुठल्याही पदावर असा; मात्र तुम्ही आहात तर जनतेचे लोकसेवकच; तुम्ही आम जनतेसाठी कुठल्याही प्रकारचे साहेब नाहीत.मात्र काहीजण सर्व काही विसरून ‘मी बडा..मी बडा..असे दाखवून आम जनतेची दिशाभूल करतांना दिसून येत आहेत.मात्र भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर याला अपवाद असल्याचे दिसून येत आहेत.त्यांचा आदर्श इतरांनी घेणे आवश्यक आहे.नाहीतर काहीजण ‘चोरांचे साथीदार आणि चल मेरे घोडीदार’अशी चोर घोड्यांची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.एखादा निर्णय घ्यायचा म्हटला तर अरे..तो आपल्या बिरादरीचा आहे; आपल्या क्षेत्रातील आहे; बघू काय आहे तर…असे चोर घोडे करून हात झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा हल्ली प्रकार निदर्शनास येऊ लागला आहे.अशांवर त्वरित आळा घातला पाहिजे; अन्यथा केवळ देखावा करून ‘चल मेरे साथी’ असे करून आम जनतेला चुना लावल्याशिवाय राहणार नाहीत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींची अंतिम लाभार्थी यादी जाहीर; ८० लाखाहून अधिकच्या महिलांचे दीड हजार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :- 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची अंतिम लाभार्थी यादी निश्चित करण्यात आली असून राज्यातील १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ महिला योजनेसाठी...

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव; राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती,दिव्यांग व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी भारत सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत दरवर्षी ३ डिसेंबर रोजी...

तब्बल सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेली बारावीची विद्यार्थिनी सापडली पतीसोबत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बारावीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सहा महिन्यांपूर्वी घरी कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला.मात्र,मुलीची काहीच माहिती मिळत नसल्याने अखेर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या मेधा भाले यांच्यावर कारवाईची मागणी.. – भाजप महिला आघाडीच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर येथील काँग्रेसच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका ॲड.मेधा भाले यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!