Sunday, October 11, 2026
Homeभंडाराबदमाश जावयाने सासऱ्याच्या छातीमध्ये भोसकला चाकू; छातीमध्ये रूतलेल्या चाकूसह गाठले रुग्णालय..

बदमाश जावयाने सासऱ्याच्या छातीमध्ये भोसकला चाकू; छातीमध्ये रूतलेल्या चाकूसह गाठले रुग्णालय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.एका ३५ वर्षीय पुतणजावयाने सासऱ्यावर जीवघेणा चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना काल शनिवारच्या सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मडेघाट येथे घडली.जावयाने जीवघेणा चाकू हल्ला केल्यानंतर सासऱ्याच्या छातीमध्ये भोसकलेला चाकू शरीरातच सोडून घटनास्थळावरून पळ काढला.दरम्यान,ग्रामस्थांच्या मदतीने जखमी सासऱ्याने छातीमध्ये रूतलेल्या चाकूसह लाखांदूर ग्रामीण रुग्णालय गाठले.तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले.राहुल राऊत वय ३५ वर्षे, रा.खालापूर,हल्ली मुक्काम-खैरणा,ता.लाखांदूर असे चाकूहल्ला करणाऱ्या आरोपी जावयाचे नाव आहे.तर दीपचंद केवळराम ढोरे वय ४५ वर्षे, रा.मडेघाट,ता.लाखांदूर,जि.भंडारा असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. आरोपी राहुल याच्या पत्नीचा लग्नानंतर दोन वर्षातच मृत्यू झाला होता.दरम्यान,मृत पत्नीच्या वाट्याला येणारी शेतजमीन मला द्यावी,या मागणीला घेऊन त्याने सासऱ्यावर जीवघेणा चाकू हल्ला केल्याचे समोर आले आहे.
गंभीर जखमी असलेले दीपचंद ढोरे यांना मडेघाट येथे वडिलोपार्जित पाच एकर शेतजमीन आहे.दीपचंद ढोरे
हे तिघे भाऊ व एक बहीण असल्याने त्यांनी यापूर्वी सर्व भावंडांना प्रत्येकी एक-एक एकर शेतजमीन वाटून दिली होती.अश्यातच दीपचंद यांची आई जिवंत असल्याने दीपचंद स्वतःची व आईच्या हिश्याची शेतजमीन स्वतः करतात.दरम्यान,दीपचंदचे मोठे भाऊ रतीराम यांच्या मुलीचा विवाह घटनेतील आरोपी राहुल राऊत याच्याशी झाला होता.लग्नानंतर दोन वर्षातच मुलीचा मृत्यू झाला. रतिरामचाही मृत्यू झाल्याने त्याची पत्नी सरिता माहेरी खैरणा येथे राहत आहे.पत्नीच्या निधनानंतर घटनेतील आरोपी सासूसोबतच खैरणा येथे राहत होता.दीपचंदने वहिनीशी(रतीराम यांची पत्नी)बोलून त्यांची शेती बटईने करण्याची हमी दिली. मात्र,काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास दीपचंद हे किराणा साहित्याची खरेदी करण्यासाठी जात असतांनाच आरोपी जावयाने त्यांना आवाज देत जीवघेणा चाकू हल्ला केला आणि घटनास्थळावरून पोबारा केला.दरम्यान नागरिकांनी तात्काळ धाव घेत दीपचंद यांना रुग्णालयात दाखल केले.या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपी जावयावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आणखी एका शेतकऱ्याने तलावात उडी घेत संपवले जीवन..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी विहिरीत उडी...

अज्ञात तरुणाचा रेल्वेने कटून मृत्यू; देसाईगंज शहरातील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एका अज्ञात तरुणाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ११ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास देसाईगंज शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या गोंदिया मार्गे...

आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात; श्रद्धेसोबत जीवाची काळजी घेणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-आज,रविवार ११ ऑक्टोंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.नवरात्रीच्या दिवसांत अनेक भाविक उपवास करतात.धार्मिक श्रद्धेपोटी पायात चप्पल न घालता अनवाणी चालण्याची प्रथा अनेक...

चेक बाऊन्स प्रकरणी कर्जदाराला सहा महिन्याचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-कित्येकदा अनेकजण राष्ट्रीयकृत बँका वा इतर पतसंस्थांकडून कर्ज उचलून त्यांची परतफेड करण्याचे टाळत असतात.त्यातच,काहीजण बँकेच्या खात्यात रक्कम नसतांनाही चेक देऊन परतफेडीचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!