Saturday, October 10, 2026
Homeवर्धाचेक बाऊन्स प्रकरणी कर्जदाराला सहा महिन्याचा कारावास..

चेक बाऊन्स प्रकरणी कर्जदाराला सहा महिन्याचा कारावास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-कित्येकदा अनेकजण राष्ट्रीयकृत बँका वा इतर पतसंस्थांकडून कर्ज उचलून त्यांची परतफेड करण्याचे टाळत असतात.त्यातच,काहीजण बँकेच्या खात्यात रक्कम नसतांनाही चेक देऊन परतफेडीचा मोठा दावा करतात आणि आपल्याच पायावर डोके आपटून बसतात.अश्याच प्रकारची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट शहरातून समोर आली आहे.विशेष म्हणजे, कर्जदाराने कर्ज तर घेतले,पण त्याची परतफेडही केली नाही आणि उलट ज्या बँकेच्या खात्यात पैसे नव्हते, अश्या बँकेचा चेक दिला.प्रकरणी पतसंस्थेने न्यायालयात धाव घेत कर्जदाराला धडा शिकवला.न्यायालयाने तक्रारदार व आरोपी पक्षाची बाजू ऐकूण घेतल्यानंतर गुन्हा सिध्द झाल्याने कर्जदारास सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा व पतसंस्थेस नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.नरेश बबनराव नागोसे असे कर्जदार आरोपीचे नाव आहे.
नरेश नागोसे यांनी हिंगणघाट शहरातील संत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्थेकडून ३ डिसेंबर २०२४ रोजी पतसंस्थेच्या नियम व अटीनुसार तसेच आवश्यक ते दस्तऐवज करून ७० हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न केल्याने पतसंस्थेने कर्ज रकमेचा हप्ता भरण्याची विनंती कर्जदार नागोसे यांना केली.मात्र, त्यांनी कर्ज भरण्यासाठी ९९ हजाराचा चेक(धनादेश) पतसंस्थेला दिला.धनादेश अनादरीत(चेक बाऊन्स) झाल्याने पतसंस्थेचे व्यवस्थापक मधुसूदन वामनराव कानकाटे यांनी हे प्रकरण शहरातील मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात कलम १३८ नुसार दाखल केले.या प्रकरणी कर्जदार नरेश नागोसे यास अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एच.सैयद यांनी सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा व ९९ हजार रूपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्षुल्लकशा कारणावरून शालेय विद्यार्थ्याने घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-क्षुल्लकशा कारणावरून एका ११ वर्षीय शालेय विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर शहरालगत असलेल्या बल्लारपूर मार्गावरील विसापूर येथील एका...

माहूरगडच्या श्री रेणुका माता शक्तिपीठातून दिव्य ज्योत आणण्यासाठी चोपचे भक्त रवाना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नवरात्रोत्सवानिमित्त श्री रेणुका माता शक्तिपीठ,माहूरगड येथून पवित्र दिव्य ज्योत आणण्यासाठी देसाईगंज तालुक्यातील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ,चोपचे भक्त आज,शनिवार १० ऑक्टोंबरला रवाना झाले.गेल्या...

आगामी काळात अन्न धान्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा महाराष्ट्र राज्यात पड़लेल्या भीषण दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतातील उभी पिके उद्धवस्त झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात...

तब्बल १२ लाखांहून अधिक हिवताप चाचण्या; हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!