Saturday, September 12, 2026
Homeवर्धानोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार वर्धा जिल्ह्यात उघडकीस आला आहे.विशेष म्हणजे,पैसे दिल्यानंतर नोकरी कधी लावून देणार,अशी विचारणा केल्यावर आरोपीने नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखविले. सोबतच मुख्य ऑर्डर लवकरच येईल,असे सांगून हात झटकले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच एका महिलेने पोलिसांत तक्रार दिली.त्यावरून,हिंगणघाट पोलिसांनी स्वप्नील संतोष वानखेडे रा.बऱ्हाणपूर, जि.अमरावती,अप्पासाहेब पाटील,रा.मुकुंदवाडी, जि.छत्रपती संभाजीनगर यांच्याविरुद्ध हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.तर यासीमा मोहम्मद इस्तियाकी शेख वय ३६ वर्षे,रा.निशानपूरा वॉर्ड,हिंगणघाट,जि.वर्धा असे फसवणूक झालेल्या तक्रारदार महिलेचे व यासीमा यांची मैत्रीण जागृती प्रमोद धोटे यांचीही फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
यासीमा शेख या यवतमाळ जिल्ह्यातील चोरांबा येथील आदिवासी आश्रम शाळेत परिचारिका म्हणून काम करतात.मागील वर्षी यासीमा यांची मैत्रीण जागृती धोटे यांच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील बऱ्हाणपूर येथील स्वप्नील संतोष वानखेडे याच्याशी ओळख झाली. दरम्यान,स्वप्नील वानखेडे याने यासीमा यांना माझी ओळख मंत्रालयात असून कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देतो,असे सांगितले.यामुळे यासीमा यांनी त्याच्या खात्यात वेळोवेळी एकूण सहा लाख रुपये टाकले.तसेच तक्रारदार महिलेची मैत्रिण जागृती धोटे हिच्याकडून सुद्धा सात लाख रूपये घेत तिची सुद्धा फसवणूक केली.जागृती व तक्रारदार महिलेने पैसे दिल्यावर नोकरी कधी लावणार अशी विचारणा आरोपीकडे करू लागले.अशावेळी आरोपीने तक्रारदार हिला व तिच्या पतीला कोल्हापूर येथे बोलावून घेतले. आरोपीने तिथे तक्रारदार व तिच्या पतीला नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखविले.सोबतच मुख्य ऑर्डर लवकरच येईल,असे सांगितले.त्यानंतर नियुक्त्तीबाबत विचारले असता तो उडावाउडवीची उत्तरे देऊ लागला.आता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिल्याने प्रकरणास वाचा फुटली. प्रकरणाचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!