Wednesday, October 7, 2026
Homeवर्धाउभ्या ट्रकला कारची धडक; दोन महिलांचा मृत्यू,तर आठ जण गंभीर जखमी..

उभ्या ट्रकला कारची धडक; दोन महिलांचा मृत्यू,तर आठ जण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घालून घडलेल्या अपघातात दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार २३ मे रोजी पहाटेच्या सुमारास तुळजापूर-नागपूर महामार्गावरील वर्ध्याच्या सालोड-नागठाणा(सावंगी बायपास)परिसरात घडली.
मोनाली निलेश मेश्राम वय ३७ वर्षे व किशोरी उके वय ४९ वर्षे दोघीही रा.गजानन नगर,नागपूर अशी मृतक महिलांची नावे आहेत.तर तुषार लक्ष्मणराव जाधव(वाहन चालक)वय ३७ वर्षे,तनिष चंद्रशेखर उके वय ६ वर्षे, दिव्यांशी निलेश मेश्राम वय १० वर्षे,आराध्य संतोष उके वय १३ वर्षे, ईशान्य अनिल बारसकर वय १७ वर्षे,नीता अनिल बारसकर वय ५५ वर्षे,साधना अनिल बारसकर वय ५६ वर्षे,कांचन चंद्रशेखर उके वय ४२ वर्षे अशी जखमींची नावे आहेत.
नागपूरच्या गजानन नगर परिसरातील दहाजण एमएच ४९ यू ०१७९ क्रमांकाच्या इर्टिगा कारने सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर व अक्कलकोट येथे  देवदर्शनासाठी गेले होते.दर्शन आटोपून सर्वजण  महामार्गाने नागपूरकडे परत येत होते.दरम्यान, वर्ध्याच्या सावंगी बायपास मार्गावर भाविकांची कार  रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरात जाऊन धडकली.धडक इतकी भीषण होती की कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले.अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.अपघातात कारमधील आठ जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने वर्ध्याच्या सावंगी मेघे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.रात्रभर ड्रायव्हिंग केल्याने चालकाला झोपेची डुलकी आली असावी आणि सदरचा अपघात घडला असावा,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!