Wednesday, August 19, 2026
Homeवर्धाखुद्द पत्नीनेच प्रियकर दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा.. -अनैतिक संबंधाचा बिन भाड्याच्या...

खुद्द पत्नीनेच प्रियकर दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा.. -अनैतिक संबंधाचा बिन भाड्याच्या खोलीत ‘दी एंड’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-अनैतिक संबंधात आडकाठी येणाऱ्या पतीचा खुद्द पत्नीनेच प्रियकर चुलत दिराच्या मदतीने काटा काढल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेकापूर(बाई)गावात उघडकीस आली.विशेष म्हणजे, पतीला ठार करणाऱ्या पत्नीनेच मृतदेहाची माहिती दिल्याने प्रकरणाचा भांडाफोड झाला.संतोष पांडुरंग कैकाडे वय ४२ वर्षे,रा.शेकापूर(बाई),ता.हिंगणघाट, जि.वर्धा असे मृतक पतीचे नाव आहे,तर मृताची पत्नी सपना संतोष कैकाडे वय ३६ वर्षे व प्रियकर चुलत दिर शुभम रमेशराव कैकाडे वय ३० वर्षे अशी हत्या करणारे व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारे शुभमचे दोन मित्र सचिन प्रभाकर बसुणे वय ३० वर्षे आणि प्रशांत रमेश करपे वय ३६ वर्षे,दोघेही रा.माढळी अशी आरोपींची नावे असून या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,मृतक संतोष कैकाडे यांच्या पत्नीचे गावातीलच चुलत दिर शुभम कैकाडे सोबत प्रेमसंबंध होते.घटनेच्या दिवशी म्हणजेच १६ ऑगस्टच्या रात्री संतोष कैकाडे हे गावात भजनाचा कार्यक्रम असल्याने त्या ठिकाणी गेले होते.रात्री भजन संपवून घरी परतले असता त्यांना पत्नी सपना आणि प्रियकर शुभम हे दोघेही घरात आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले.आपले अनैतिक संबंध इतर ठिकाणी उघडकीस येऊ नये तसेच अनैतिक संबंधात अडसर ठरू शकतो म्हणून पत्नी सपना व प्रियकर शुभम यांनी मिळून घरातच संतोष यांचा गळा आवळून खून केला.त्यानंतर ही घटना कोणाच्याही लक्षात येऊ नये आणि पुरावा नष्ट व्हावा,यासाठी प्रियकर शुभमने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने संतोष यांचा मृतदेह उचलून गावाजवळील विहिरीत फेकून दिला.संतोष कैकाडे हे गेल्या तीन दिवसांपासून गावात कुठेही दिसत नसल्याने गावकऱ्यांना आधीच संशय आला होता.दरम्यान,काल मंगळवारी खुद्द पत्नीनेच पतीचा मृतदेह गावाबाहेरील विहिरीत पडून असल्याचे गावकऱ्यांना सांगितले.गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि दोघांच्याही अनैतिक संबंधातून फुललेल्या प्रेमाचा बिन भाड्याच्या खोलीत ‘दी एंड’ झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यमान आमदारांच्या पीए व वाहनचालकांच्या मानधनात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदारांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए आणि वाहनचालकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.सदरची...

सावधगिरी बाळगा..! नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लोन किंवा ट्रेडिंग ॲपवर विश्वास ठेवू नये..

उद्रेक न्युज वृत्त :-अल्पावधीत ट्रेडिंगच्या माध्यमातून लखपती करण्याचे तसेच तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनधिकृत डिजिटल लेंडिंग ॲप्स आणि संशयास्पद कंपन्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित.. आता सर्पदंशाची प्रत्येक घटना,विषप्रतिबंधक लसीचा साठा,केलेले उपचार व मृत्यूची नोंद करणे बंधनकारक..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी.. – देसाईगंज-आरमोरी मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज-आरमोरी मार्गावर जणूकाही अपघातांच्या मालिकांचे सत्र सुरू झाले की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.नुकताच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कुरुड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!