- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
पुणे :-घराजवळ असणाऱ्या जनावरांच्या गोठ्याजवळ विजेचा जोरदार शॉक लागून दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १९ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील राहू गावच्या सोनवणेमळा परिसरात घडली.ओम नितीन भोईटे वय १९ वर्षे व रोहित अनिल भोईटे वय २१ वर्षे अशी मृतक दोन सख्या चुलत भावांची नावे असून या दोघांना वाचवण्यासाठी धावून गेलेली ओमची आई सोनाली नितीन भोईटे वय ४० वर्षे या जखमी झाल्या.
आज सकाळच्या सुमारास जनावरांच्या गोठ्याजवळ कपडे वाळत घातलेले असतांना एका लोखंडी अँगला विद्युत प्रवाह आल्याने त्यास ओमचा स्पर्श होताच सुरुवातीला ओम याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याला वाचवण्यासाठी रोहित पुढे गेला असता त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला.दरम्यान, त्यांना वाचवण्यासाठी ओमची आई सोनाली भोईटे ह्या गेल्या असता त्यांनाही विजेचा सौम्य धक्का बसला.सुदैवाने त्या बाजूला फेकल्या गेल्याने थोडक्यात बचावल्या.मात्र, घटनास्थळीच तिघेही बेशुद्ध पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांना तातडीने राहू येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.सोनाली भोइटे यांच्यावर उपचार करून त्यांची प्रकृती स्थिर आहे.मात्र,ओम आणि रोहित यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती दोघांनाही मृत घोषित केले.या घटनेमुळे राहू परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून तरुण चुलत भावांच्या अकाली मृत्यूने भोइटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.प्रकरणी
यवत पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.दरम्यान,आज दुपारी तीन वाजता दोन्ही भावंडांवर राहू येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
- Advertisement -

