Friday, October 9, 2026
Homeपुणेबापरे..! फेरफार नोंदीसाठी तलाठ्याने मागितले १ लाख २५ हजार.. - तलाठी एसीबीच्या...

बापरे..! फेरफार नोंदीसाठी तलाठ्याने मागितले १ लाख २५ हजार.. – तलाठी एसीबीच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफार नोंदीमध्ये नाव नोंदवण्यासाठी चक्क १ लाख २५ हजाराची लाच मागून १ लाख रुपये स्विकारले व उर्वरित रकमेसाठी तगादा लावला असता पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठ्यास रंगेहाथ अटक केल्याची घटना आज, मंगळवार १९ मे रोजी पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील माण गावच्या साज्यात घडली. संतोष प्रल्हाद राणे वय ४५ वर्षे असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
प्रकरणातील ३५ वर्षीय तक्रारदार यांनी वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफार नोंदीमध्ये स्वतःचे आणि भावाचे नाव नोंदवण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज केला होता.या कामासाठी तलाठी राणे यांनी सुरुवातीला १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागितली होती.त्यापैकी,१ लाख रुपये यापूर्वीच स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले.उर्वरित २५ हजार रुपयांसाठी तक्रारदाराकडे सतत मागण केली जात होती.याबाबत तक्रारदाराने ११ मे २०२६ रोजी पुणेच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.यानंतर, १४ मे २०२६ रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई करण्यात आली.या पडताळणीदरम्यान तलाठी संतोष राणे यांनी एकूण १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केल्याचे आणि त्यातील १ लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य केल्याचे समोर आले.तसेच,उर्वरित २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचेही स्पष्ट झाले.त्यानुसार,आज मंगळवार १९ मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान एसीबीने माण येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. या वेळी आरोपी संतोष राणे याने २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. प्रकरणी आरोपीविरुद्ध हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त भारती मोरे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

‘दिशा अभियान’अंतर्गत विशेष शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा,यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे.या विद्यार्थ्यांना...

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्यासाठी रिट याचिका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तब्बल ९८ हजार ७८२ मतदारांचे अर्ज प्रलंबित असतांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची घाई केली जात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!