Friday, October 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील परिस्थितीच्या आधारे राज्यातील सुमारे २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करुन विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता आणखी १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या तीव्रतेची पडताळणी केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या ट्रिगर-१ यादीतील तालुकांव्यतरिक्त १८ तालुक्यांमध्ये देखील दुष्काळाची तीव्रता असून सदर तालुक्यातील प्रमुख ५ पिकांच्या २० टक्के सर्व्हेक्षण करून वस्तुस्थिती तपासण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.विशेष म्हणजे,दुष्काळ जाहीर करण्यासाठी सर्व्हेक्षण अहवाल महत्वाचा असतो.त्यानुसार,खालील १८ तालुक्यांत सर्वप्रथम सर्व्हेक्षण करून दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे.
  • छत्रपती संभाजीनगर महसूल विभाग👇
 नांदेड जिल्हा :- मुदखेडा व मुखेड तालुका

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
  • नागपूर महसूल विभाग👇
 चंद्रपूर :- जिवती,ब्रम्हपूरी व बल्लारपूर
गोंदिया :- आमगांव,देवरी,सालेकसा व गोंदिया
वर्धा :- कारंजा
भंडारा :- मोहाडी व तुमसर
  • नाशिक महसूल विभाग👇
नाशिक :- त्र्यंबकेश्वर,चांदवड व निफाड
  • पुणे महसूल विभाग👇
सातारा :- पाटण
सांगली :- शिराळा व वाळवा
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

‘दिशा अभियान’अंतर्गत विशेष शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा,यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे.या विद्यार्थ्यांना...

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्यासाठी रिट याचिका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तब्बल ९८ हजार ७८२ मतदारांचे अर्ज प्रलंबित असतांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची घाई केली जात...

माता व बालकांचे पोषण सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ‘व्हील्स ग्लोबल फाउंडेशन’शी सामंजस्य करार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील माता,अर्भक आणि लहान बालकांचे पोषण सुधारण्यासाठी तसेच कुपोषण प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशन इंडिया...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!