Saturday, October 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकाँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर मतदार संघ,पुणे पदवीधर मतदार संघ, औरंगाबाद पदवीधर मतदार संघ,तर अमरावती शिक्षक मतदार संघ व पुणे शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे.निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया २९ सप्टेंबरपासून सुरू झाली असून २३ ऑक्टोंबर रोजी मतदान व २७ ऑक्टोंबर २०२६ रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. अश्यातच आता विधानपरिषदेच्या निवडणुकीला वेग आला आहे.सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केलेल्या असतांनाच विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या तीन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.यात नागपूर पदवीधर,अमरावती शिक्षक व पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.तर दुसरीकडे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.तर अमरावती विभाग शिक्षक मतदार संघामधून अदिती पोहरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. याबाबत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेनंतर सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी काल शुक्रवारच्या रात्री उमेदवारांची घोषणा केली.
विशेष म्हणजे,नागपूर पदवीधर मतदार संघ भाजपचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो.मात्र,गेल्यावेळी काँग्रेसचे आमदार ॲड.अभिजित वंजारी यांनी तो उद्धवस्त केला होता.अश्यातच वंजारी यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती.त्यामुळे पक्षाकडून कुणीही या जागेवर दावा केला नाही.नागपूर विद्यापीठाच्या सिनेटमधून राजकीय क्षेत्रात प्रवेश करणारे अभिजित वंजारी यांनी २०१४ साली पूर्व नागपुरातून विधानसभा निवडणूक लढवली.मात्र,त्यांना त्यात यश आले नाही.यानंतर त्यांनी दोन वर्षे मतदारसंघात काम केल्यानंतर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात संपर्क सुरू केला.२०२० साली पक्षाने त्यांना संधी दिली आणि वंजारी यांनी भाजपचा अभेद्य बालेकिल्ला सर करून काँग्रेसचा झेंडा फडकवला. सध्या भाजपने उमेदवार जाहीर केला नसला तरी बालेकिल्ला हातात राहण्यासाठी कंबर कसली आहे.येत्या,२३ ऑक्टोंबरला होणाऱ्या निवडणुकीत भाजपला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्याचे,तर काँग्रेससमोर विद्यमान जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

सहपालकमंत्र्यांकडून सार्वजनिक बांधकाम,राष्ट्रीय महामार्ग व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कामांचा आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांची वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत.खराब रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देऊन प्रत्येक कामाची गुणवत्ता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!