Saturday, October 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तधावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर घडली.धावत्या पिकअप वाहनाचे पुढील डाव्या बाजूचे टायर अचानकपणे निखळल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन महामार्गावर उलटला.यात नऊ मजूर गंभीर जखमी झाले,तर आठ जण किरकोळ जखमी झाले.सर्व मजूर हे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील आथली,डांबेविरली व मांदेड येथील असल्याची माहिती समोर आली आहे.ते बुलढाण्याच्या दिशेने सोयाबीन कापणीच्या कामासाठी निघाले होते. मोहन शीरभाऊ,उषा शिवरकर,रीना रामटेके,कमोद भावे, बंडू उरकुडे, योगेश उरकुडे,संजय सोंदरकर,शांता सोनवणे व वंदना बुराडे अशी गंभीर जखमींची नावे आहेत.तर किरकोळ जखमींमध्ये रोहित सहारे,अमर सहारे, स्वभा वाघमारे,विनोद रामटेके,अजय राऊत, अशोक कुंबले,महेंद्र शिवरकर व ललिता राऊत यांचा समावेश आहे.सर्व जखमींना तातडीने धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसली तरीही अचानक घडलेल्या प्रसंगाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

सहपालकमंत्र्यांकडून सार्वजनिक बांधकाम,राष्ट्रीय महामार्ग व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कामांचा आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांची वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत.खराब रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देऊन प्रत्येक कामाची गुणवत्ता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!