Friday, October 2, 2026
Homeगडचिरोलीअल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकास पाच वर्षाचा कारावास..

अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकास पाच वर्षाचा कारावास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कुकामेटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची घटना घडली होती.या प्रकरणी ४३ वर्षीय शिक्षक तथा मुख्याध्यापक रवींद्र उस्तुजी गव्हारे यास न्यायालयाने ५ वर्षांचा सश्रम कारावास आणि विविध कलमान्वये ७० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.सदरचा निकाल हा अहेरीच्या अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने काल गुरुवारी दिला. विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा प्रकार मार्च २०२५ मध्ये कुकामेटा येथील एकशिक्षकी शाळेत घडला होता.गव्हारे हा तिसरी ते पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या ९ ते ११ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनींना आपल्या कक्षात एकट्याने बोलावून त्यांच्याशी लैंगिक गैरवर्तन करीत असल्याचे तपासात समोर आले.हा प्रकार कोणाला सांगितल्यास मारहाण करण्याची तसेच शाळेतून काढून टाकण्याची धमकी तो विद्यार्थिनींना देत होता.दरम्यान,दोन सख्ख्या बहिणींनी शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या आईने कारण विचारले.त्यावेळी घाबरलेल्या मुलींनी रडत-रडत आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला होता.त्यानंतर,मुलींच्या आईने लाहेरी उपपोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान शाळेतील आणखी काही विद्यार्थिनींसोबतही अशाच प्रकारचे गैरवर्तन झाल्याचे समोर आले.त्यानंतर पोलिसांनी गव्हारे याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.दरम्यान,भामरागडचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांनी या प्रकरणाचा तपास केला.न्यायालयात सादर करण्यात आलेले साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे आरोपी मुख्याध्यापक रविंद्र गव्हारे याला भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ अंतर्गत ५ वर्षांचा कारावास आणि २५ हजार दंड,कलम ७५(२)अंतर्गत ३ वर्षांची शिक्षा व २५ हजार दंड,धमकी दिल्याप्रकरणी बीएनएस कलम ३५१(२)(३)अंतर्गत २ वर्षांची शिक्षा,तर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ३ व २ वर्षांची शिक्षा तथा २० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.विशेष म्हणजे,न्यायालयाने सुनावलेल्या विविध शिक्षांपैकी आरोपीला एकूण ५ वर्षाची शिक्षा व ७० हजार रुपयांचे दंड अशी शिक्षा भोगावी लागणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

श्रमदान,सत्कार अन् संदेशपर नाटक; नैनपूरच्या शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवारी महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर येथे पालक सभा,श्रमदान,सत्कार व विविध...

कारवाईच्या भीतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई पसार.. -प्रकरण मिटविण्यासाठी दहा हजाराची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गुन्ह्यात तडजोड करून प्रकरण मिटवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस शिपाई यांच्याविरुद्ध...

गडचिरोली जिल्ह्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी निर्बंध; डीजे व अतितीव्र ध्वनी उपकरणांच्या वापरास बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सण,उत्सव,मिरवणुका तसेच धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी उपकरणांच्या वापरावर निर्बंध...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम लागू करा; अन्यथा देशव्यापी तीव्र आंदोलन व जनगणनेवर बहिष्कार.. -सकल ओबीसी संघटनेचा इशारा; आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी होऊ घातलेल्या जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसेल तर जनगणनेत ओबीसी समाज सहभाग नोंदवणार नाही. ड्रॉप-डाऊन मेन्यु व स्वतंत्र काॅलम लागु करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!