Wednesday, September 30, 2026
Homeगडचिरोलीअतिवेगाने आणि मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करावी-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा -रस्ते अपघातातील...

अतिवेगाने आणि मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करावी-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा -रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये ३३.५६ टक्के घट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत घट झाली असली,तरी एकूण अपघातांची संख्या आणि दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षात घेऊन अपघात प्रतिबंधक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात.वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासोबतच अपघातांच्या मूळ कारणांचा सखोल तपास करून आवश्यक सुधारणा कराव्यात,असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीत रस्ते अपघातांची आकडेवारी, रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल,राष्ट्रीय महामार्गांची प्रलंबित कामे आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक एम.रमेश,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता तथा रस्ते सुरक्षा समितीच्या सचिव सोनाल चव्हाण,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरणे मोरे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता प्रफुल केळकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सादर केलेल्या आकडेवारीनुसार,जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत जिल्ह्यात १७७ रस्ते अपघातांत १४६ जणांचा मृत्यू झाला होता.तर यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत २१० अपघातांत ९७ जणांचा मृत्यू झाला.तुलनात्मक कालावधीत मृत्यूंच्या संख्येत ३३.५६ टक्के घट झाली असली,तरी अपघातांची संख्या वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
एकूण ९७ मृत्यूंपैकी ५९ मृत्यू दुचाकीस्वारांचे असून,हे प्रमाण सुमारे ६१ टक्के आहे.या पार्श्वभूमीवर हेल्मेट वापराच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच अतिवेगाने आणि मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करावी.अपघातप्रकरणी केवळ गुन्हा नोंदविण्यापुरते मर्यादित न राहता रस्त्यांची स्थिती,वाहनांचा वेग आणि अन्य कारणांचा सखोल अभ्यास करून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात,असे त्यांनी सांगितले.
  • रस्तेदुरुस्ती व प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश👇
राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख रस्त्यांवरील कामांच्या संथ गतीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गडचिरोली–आरमोरी,चामोर्शी,धानोरा तसेच आष्टी–आलापल्ली–सिरोंचा मार्गांवरील खड्डे बुजविणे आणि आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
रस्त्यांची नियमित देखभाल न करणाऱ्या कंत्राटदारांना केवळ नोटिसा देण्यापुरते मर्यादित न राहता नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी. आवश्यकतेनुसार संबंधितांना काळ्या यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करावी,अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
  • शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर👇
गडचिरोली शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी इंदिरा गांधी चौकाची विहित मानकांनुसार पुनर्रचना करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.आठवडी बाजार परिसर,फळ व भाजीविक्रेत्यांची ठिकाणे आणि दुकानांसमोरील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरपरिषद व पोलीस विभागाने संयुक्तपणे कार्यवाही करावी,असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा रस्ता सुरक्षा निधी व जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या (डीएमएफ)निधीतून वाहतूक सिग्नल,गतिरोधक, सीसीटीव्ही कॅमेरे,रुग्णवाहिका आणि अंगावर परिधान करण्याचे कॅमेरे यांसाठीच्या प्रस्ताव व कार्यवाहीला गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
एसटी व खासगी बसगाड्यांनी शहरात अनधिकृत ठिकाणी थांबू नये.वाहनांचा वेग मर्यादेत ठेवण्यासाठी वेगनियंत्रक उपकरणांची कार्यस्थिती तपासावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर नियमानुसार कारवाई करावी,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बैठकीला पोलीस,परिवहन,सार्वजनिक बांधकाम, नगरपरिषद तसेच रस्ता सुरक्षा समितीशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिबट्याच्या कातडीसह दोघेजण ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-नागपूरच्या महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या((डीआरआय)प्रादेशिक पथकाने  गोंदिया जिल्ह्यातील वन्यजीव तस्करांच्या मुसक्या आवळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बिबट्याची कातडी बाळगल्याप्रकरणी पथकाने दोघांना ताब्यात घेतले.धनराज...

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी; उबाठा शिवसेनेचे निवेदन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात यावर्षी पावसाने ओढ दिल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे धान पिकांवर मोठ्या प्रमाणात कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी औषधांची...

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क माफ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ...

उद्यापासून बस प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीचा प्रवास करण्यासाठी महामंडळाने 'एनसीएमसी' कार्ड अनिवार्य केले आहे.प्रवाशांना नानाविध सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी राज्य मार्ग...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!