Tuesday, September 29, 2026
Homeगडचिरोलीअखेर जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सजगतेने प्रलयकारी पुरावर मात..!

अखेर जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सजगतेने प्रलयकारी पुरावर मात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान इंद्रावती उपखोऱ्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला गेले चार दिवस भीषण पुराचा वेढा पडला होता.पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते.मात्र,अशा अत्यंत बिकट परिस्थितीत जिल्हा व स्थानिक प्रशासनाने दाखवलेली कमालीची सजगता, पूर्वतयारी,वेळेवर घेतलेले धाडसी निर्णय आणि विविध विभागांमधील अचूक समन्वयामुळे हा प्रलयकारी पूर निष्प्रभ ठरला.कोणतीही जीवितहानी होऊ न देता प्रशासनाने नागरिकांचे प्राण आणि मालमत्ता सुरक्षित ठेवून आपत्ती व्यवस्थापनाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.
  • पूर्वसूचनेची तत्पर अंमलबजावणी, सतर्कतेचा इशारा आणि अद्ययावत साधनसामग्रीची पूर्वतयारी👇
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अतिवृष्टीचा इशारा मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने अत्यंत जलद हालचाली केल्या.२५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजताच इंद्रावती, पर्लकोटा व पामुलगौतम नद्यांना महापूर येण्याचा अचूक अंदाज बांधून भामरागड, अहेरी व सिरोंचा तालुक्यांना तात्काळ सतर्कतेचा इशारा देण्यात आला.नदीकाठच्या नागरिकांना सावध करण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि चॅनेल्स यांसारख्या आधुनिक माध्यमांसोबतच नगर पंचायतीच्या घंटागाड्या,लाउडस्पीकर आणि पारंपारिक दवंडीचा प्रभावी वापर करण्यात आला.
संभाव्य धोका ओळखून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रत्यक्ष पूर परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच भामरागड तालुक्यात जय्यत पूर्वतयारी केली होती. तालुक्यातील ४२ आपत्ती प्रवण गावांमध्ये ग्रामसेवकांच्या अधिनस्त ४२ ‘ग्राम आपत्ती प्रतिसाद किट’ उपलब्ध करून देण्यात आल्या.याशिवाय स्थानिक पातळीवर मदतकार्यासाठी ३३ बचाव किट,फ्लोटेबल आणि फोल्डेबल मल्टी स्ट्रेचर,मल्टीपर्पज इनोव्हेटिव्ह लाइफ जॅकेट तसेच प्रत्येकी १५० लाइफ बॉय व १५० लाइफ जॅकेट्स पूर परिस्थितीपूर्वीच पुरवण्यात आली होती. भामरागड तहसील कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तीन पाळ्यांमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आणि संपूर्ण यंत्रणा पूर्ण साधनसामग्रीसह सज्ज ठेवण्यात आली.
बोटीपासून हेलिकॉप्टरपर्यंत गतिमान बचावकार्य👇
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आणि प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमर राऊत,उपविभागीय अधिकारी शुभम पाटील आणि तहसीलदार किशोर बागडे यांच्या स्थानिक नेतृत्वात राबवलेली बचावमोहीम प्रशासनाच्या मानवी संवेदनशीलतेची साक्ष देणारी ठरली.पूरबाधित व सखल भागातील २५२ कुटुंबांतील ५२५ नागरिकांना तातडीने सेफ हाऊस,समूह निवासी शाळा,वनपरिक्षेत्र कार्यालय हॉल आणि कस्तुरबा गांधी निवासी शाळेत सुरक्षित हलवण्यात आले.स्थलांतरित नागरिकांसाठी निवाऱ्यासह अखंड वीज,जनरेटर,शुद्ध पिण्याचे पाणी आणि मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली. २५ सप्टेंबरच्या रात्री आंबेडकर वॉर्डात अडकलेल्या पाच नागरिकांना एसडीआरएफ आणि पोलिसांनी अंधारातही बोटीच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढले.
पुरामुळे भामरागड-आलापल्ली महामार्ग ठप्प झालेला असतांना प्रशासनाने वैद्यकीय आणीबाणी अत्यंत कौशल्याने हाताळली.ग्रामीण रुग्णालयातील गंभीर रुग्ण चैतु हबका व मालु वड्ढे यांना एसडीआरएफच्या बोटीने तुडुंब भरलेली पर्लकोटा नदी पार करून पलीकडे सज्ज रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तापामुळे प्रकृती चिंताजनक असलेल्या संगीता उसेंडी, अपेक्षा आलाम आणि  रोशन मडावी यांची स्थिती अधिक नाजूक बनल्याचे लक्षात येताच जिल्हा प्रशासनाने स्थानिक हेलिकॉप्टरची मदत घेतली.२६ सप्टेंबर रोजी सकाळी एकाच मोहिमेत या तिन्ही गंभीर रुग्णांना भामरागडहून हेडरी येथील काली अम्मा रुग्णालयात एअरलिफ्ट करून त्यांचे प्राण वाचवण्यात आले.केवळ जिवंतांचे रक्षणच नव्हे,तर मौजा मल्लमपोडुर येथील जत्ते धुर्वे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यासाठी पुराच्या पाण्यातून बोटीने मृतदेह आणणे आणि प्रक्रियेनंतर रात्री गावी सुरक्षित पोहोचवणे,हे कर्तव्यदक्षतेचे अनोखे उदाहरण ठरले.
  • पूर ओसरताच युद्धपातळीवर पुनर्वसन आणि संपर्क पूर्ववत👇
इंद्रावती नदीचा विसर्ग तब्बल ७.०३ लक्ष क्युसेक्सवर पोहोचला होता आणि पर्लकोटा नदी ९.७० मीटरच्या उच्चांकावर वाहत असतांना तालुक्यातील चार प्रमुख मार्गांसह ६३ गावांचा संपर्क तुटला होता.अशा अभूतपूर्व संकटातही जिल्हा नियंत्रण कक्षाने दर दोन ते तीन तासांनी अचूक माहिती क्षेत्रीय पातळीवर पुरवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली,ज्यामुळे ‘शून्य जीवितहानी’ (Zero Casualty)साध्य झाली.पूर ओसरण्यास सुरुवात होताच २८ सप्टेंबर रोजी प्रशासनाने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवून जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने साचलेला गाळ हटवला आणि रोगराई रोखण्यासाठी बाधित घरांमध्ये जंतुनाशक औषधांची फवारणी केली.जिल्हास्तरीय अभियंत्यांच्या मदतीने खंडित झालेली दूरसंचार यंत्रणा आणि महावितरणचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.रात्री १० वाजता पर्लकोटा पुलावरील पाणी ओसरताच पोलीस व एसडीआरएफच्या मदतीने पुलावरील चिखल तात्काळ साफ करून वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली.
महसूल,पोलीस,राज्य आपत्ती प्रतिसाद दल(SDRF), आरोग्य,नगर पंचायत,जलसंपदा आणि वन विभाग यांच्यातील अचूक ताळमेळ आणि सुनियोजित पूर्वतयारीमुळे भामरागडवरील महापुराच्या संकटावर प्रशासनाने यशस्वी मात केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मंत्रिमंडळ बैठकीतील दहा मोठे निर्णय; माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत आरक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्री मंडळाची बैठक आज,मंगळवार २९ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या...

कुष्ठांतेयांची तालुका स्तरावर ११ सदस्यीय कार्यकारिणी गठित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,भिसी येथे सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेच्या माध्यमातून २८ सप्टेंबर रोजी कुष्ठांतेयांची सभा आयोजित करण्यात आली.वैद्यकीय अधिकारी...

सावधान..! वनविभागातील नोकरीचे आमिष पडू शकते महागात.. – वनरक्षक,वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी पदांची भरती आणि नियुक्ती शासनाच्या विहित नियमांनुसारच..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातील विविध भागांत काही व्यक्ती वनरक्षक,वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी पदांवर नियुक्ती करून देण्याचे खोटे आमिष दाखवून उमेदवारांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे...

कोणताही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये; पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-“कोणताही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये.विशेषतः रोजगारासाठी काही काळ गावाबाहेर गेलेल्या नागरिकाचे नाव केवळ त्याच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे मतदार यादीतून वगळले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!