Friday, April 24, 2026
Homeगडचिरोलीकुरखेडा तालुक्याच्या खरमतटोला येथील 'दुशीला'  बनली पीएसआय…

कुरखेडा तालुक्याच्या खरमतटोला येथील ‘दुशीला’  बनली पीएसआय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलेही ध्येय गाठता येते.हे सर्वकाही शक्य करून दाखवले गडचिरोली जिल्ह्यातील एका विवाहित स्त्रीने.नुकतेच १ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक(पीएसआय) निकालात तिने घवघवीत यश मिळविले आहे.दुशीला भीमराव शेंडे मु.खरमतटोला,पोस्ट-देऊळगाव,ता. कुरखेडा,जि.गडचिरोली येथील रहिवासी असून २०१० मध्ये त्यांचे लग्न झाले.पती चंद्रपूर थर्मल पावर स्टेशनमध्ये नोकरीला आहेत.

लग्न झाल्यावर घर संसार सांभाळत दुशीलाने जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून एमपीएससीचा गड सर केला आहे.तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.दुशीलाचे प्राथमिक शिक्षण खरमतटोला येथे झाले. त्यानंतर इयत्ता ८ ते १० वीपर्यंतचे शिक्षण देऊळगाव येथील विद्या विकास हायस्कूलमध्ये झाले.आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयातून पदवी घेतली व पदव्यूत्तर पदवी ब्रह्मपुरी येथील एन.एच. महाविद्यालयात घेतली.दुशीला घरची सर्वात मोठी मुलगी असून एक भाऊ सीआरपीएफ मध्ये कोब्रा कमांडर तर दुसरा भाऊ सिव्हिल इंजिनियर आणि लहान बहीण समाजकार्यातून पदव्यूत्तर पदवी घेतली आहे.वडील ग्रामीण भागातील शेतकरी असून देखील सर्वच मुलांना उच्च शिक्षण दिले.२०१० मध्ये दुशीलाचे लग्न वीरेंद्र मेश्राम यांच्याशी झाले.त्यांच्याकडूनच स्पर्धा परीक्षेबाबत माहिती मिळाली अन् त्यानंतर तिने अभ्यासात सातत्य ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी केली.पती चंद्रपूर थर्मल पावर स्टेशनमध्ये नोकरीला असून त्यांनी दुशीलाला साथ दिल्याने अखेर तिला यश मिळाले आहे.विशेष म्हणजे लग्नानंतर अनेकांना वाटते की,आपले करिअर संपते.लग्नानंतर महिलांची स्वप्न अपूर्ण राहतात.मात्र,गडचिरोली जिल्ह्यातील दुशीलाने लग्नानंतर देखील अत्यंत अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

दुशीलाने कोणत्याही प्रकारची शिवकणी वर्ग न लावता त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली.’सेल्फ स्टडी’वर भर देत जुन्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला.चंद्रपूर येथील लायब्ररीमध्ये सकाळी ९ ते २ सायंकाळी ४ ते ८ असा अभ्यास करीत,तिने पूर्णवेळ तयारी केली,यातूनच त्यांना यशाला गवसणी घालता आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पनीर विक्रीच्या नावाने ग्राहकांची फसवणूक; केंद्र सरकारकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त :-पनीरला बाजारात मोठी मागणी असते.विशेषतः लहान मुलांना सर्वात जास्त पनीर खायला आवडते.मात्र,काही ठिकाणी बनावट पनीर अथवा 'चीज ॲनॅलॉग' वापरून ग्राहकांची फसवणूक...

लग्नाची वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या ओमनी व्हॅनचा भीषण अपघात; ५ जण जागीच ठार,तर चारजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एखादा लग्न म्हटला तर अनेकजण आनंदाने सहभागी होतात.पण,याच आनंदावर विरजण पडल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात घडली. रात्रीच्या सुमारास लग्नाचे...

अखेर पोत्यात आढळलेल्या मृतदेहाच्या मारेकऱ्यास अटक.. – मुलीच्या अस्मितेवर घाणेरडा सौदा केल्याने हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-तब्बल दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाचा चक्क पोत्यात बांधलेला मृतदेह नागपुरातील नारा नदीच्या पुलाखालील नाल्याच्या कोरड्या भागात आढळून आल्याने परिसरात...

राज्याचे आदिवासी विकास मंत्री आज चंद्रपुरात,तर उद्याला गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अशोक उईके यांचे आज,शुक्रवार २४ एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता शासकीय विश्रामगृह...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!