Monday, June 8, 2026
Homeगडचिरोलीगरोदर महिलेला उपचारासाठी नेले खाटेवरून…-कोरची तालुक्यातील घटना..

गरोदर महिलेला उपचारासाठी नेले खाटेवरून…-कोरची तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य समस्या किती बिकट असते; याचे भयान वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.रस्ते नसल्याने येथे नेहमीच समस्या असते.आरोग्य सेवा देखील पोहचू शकत नसल्याने रुग्णांना पायपीट करत यावे लागत असते.त्यानुसार गरोदर महिलेला उपचारासाठी नेण्यासाठी खाटेवर घेऊन तीन किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे धक्कदायक चित्र जिल्ह्यात पुन्हा एकदा पाहण्यास मिळत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालयापासून पासुन २० किलोमीटर अंतरावरील असलेल्या केरामीटोला येथील गरोदर महिला रोशनी शामसाय कमरो हिला खाटेवर उचलून तब्बल तीन किलोमीटर अंतर पार करत रुग्णालय गाठावे लागले. त्या महिलेला आधी चर्वीदंड येथे नेण्यात आले.मात्र रस्ता नसल्यामुळे पाण्याने भरलेला नाला पार करावा लागला.चर्वीदंड येथून एका खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय कोरची येथे तपासणी करून गडचिरोलीला रेफर करावे लागले.

या प्रकारामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य,रस्ते यांचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावे लागत आहे. ग्रामीण भागात रस्त्या अभावी नागरिकांच्या जीवाशी खेळ चाललाय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी,तर १२ प्रवासी किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पुणे येथून नागपूरच्या दिशेने निघालेल्या  एका खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात होऊन ट्रॅव्हल्समधील तब्बल १५ जण गंभीर जखमी झाले,तर १२ जण किरकोळ...

वैनगंगा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू; पाच जण थोडक्यात बचावले..

उद्रेक न्युज  भंडारा :-जिल्ह्याच्या करचखेडा येथील वैनगंगा नदी बेटावर एका खासगी बोटीद्वारे आंघोळ करण्यासाठी गेलेल्या सात तरुणांपैकी परतीच्या वाटेवर असतांना नदीतील पाण्यात बोट उलटल्याने दोन...

आता विदर्भातील हत्तींची तयार होणार स्वतंत्र ओळख नोंदवही.. – वन विभागाच्या सहकार्याने हत्तींच्या हालचालींवर राहणार वैज्ञानिक पद्धतीने नजर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यात वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील...

नक्षलवादाच्या खात्म्यानंतर गडचिरोलीत विकासाचा नवा आराखडा.. – स्थानिक तरुणांचे कौशल्यविकास,पायाभूत सुविधा, वनहक्क आणि सेवा वितरणावर भर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांना मागे हटण्यास भाग पाडल्यानंतर आता त्या भागात निर्माण झालेली प्रशासकीय पोकळी नागरी प्रशासनाने प्रभावी सेवा,विकासकामे आणि जनसंपर्कातून भरून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!