Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीडीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करावा,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी  केले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत संरक्षित साठ्यासह ९०६ मेट्रिक टन डीएपी खताचा पुरवठा करण्यात आला असूनपुढील काही दिवसांत आणखी १ हजार २०० मेट्रिक टन डीएपी खताचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहितीही खोमणे यांनी दिली आहे.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी केवळ डीएपीवर अवलंबून न राहता कृषी विभागाने शिफारस केलेल्या पर्यायी खतांचा वापर करून संतुलित खत व्यवस्थापन करावे,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.डीएपीमध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद असते.त्याऐवजी एनपीके १०:२६:२६,एनपीके २०:२०:०:१३,एनपीके १२:३२:१६,एनपीके १५:१५:१५ तसेच युरिया-एसएसपी कॉम्प्लेक्स यांसारख्या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांना नत्र,स्फुरद आणि पालाश ही तीनही प्रमुख अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात उपलब्ध होतात.
कृषी विभागाच्या माहितीनुसार,ट्रिपल सुपर फॉस्फेट (TSP)हेही डीएपीला प्रभावी पर्याय ठरू शकते. डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि एक गोणी टीएसपी वापरल्यास स्फुरदाची गरज प्रभावीपणे पूर्ण होऊ शकते.तसेच सिंगल सुपर फॉस्फेट(SSP)हे देशांतर्गत उत्पादित खत असून त्यामध्ये १६ टक्के स्फुरदासह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.विशेषतः सोयाबीन,भुईमूग व सूर्यफूल यांसारख्या तेलबिया पिकांसाठी एसएसपीचा वापर अधिक लाभदायक असल्याचे कृषी तज्ज्ञांनी नमूद केले आहे.डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि तीन गोण्या एसएसपीचा वापर हाही एक चांगला पर्याय ठरू शकतो.
कृषी विभागाने खतांच्या किंमतींबाबतही शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.अनुदानित युरियाची किंमत प्रति गोणी २६६.५० रुपये तर डीएपीची किंमत १ हजार ३५० रुपये आहे.विविध कंपन्यांच्या संयुक्त खतांच्या किंमती वेगवेगळ्या असून,लोकप्रिय २०:२०:०:१३ आणि १०:२६:२६ खतांच्या किंमतीत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे.ग्रॅन्युलर सिंगल सुपर फॉस्फेटची किंमत सुमारे ६५० रुपये,तर झिंक बोरोन एसएसपीची किंमत सुमारे ८६० रुपये आहे.
  • खत खरेदी करतांना दक्षता घ्या👇
कृषी विभागाने शेतकऱ्यांना खत खरेदी करतांना प्रत्येक गोणीवरील मुद्रित कमाल किरकोळ किंमत (MRP) तपासूनच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.पॉस मशीनवर नवीन दर दिसत असले तरी प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे,असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!