- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी काहींच्या हातात पडली.मग शेवटी उरलेच काय?यांस जबाबदार सिस्टममधील भ्रष्ट कारभार की लगाम कसणारे शिक्षणमंत्री? निट पेपरफुटी प्रकरणात केंद्रिय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हेच जबाबदार असुन पेपरफुटी प्रकरणात असंख्य विध्यार्थांचे नुकसान झाले.तर २२ विध्यार्थांनी आत्महत्या केली.याला जबाबदार शिक्षणमंत्री असुन त्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा,या मागणीसाठी व पर्यावरणवादी,सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक तसेच कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी जंतर-मंतर दिल्ली येथे २२ दिवस उपोषण केले.त्यांच्या समर्थनाथ आज, मंगळवार २१ जुलै रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वात कुरखेडा तालुका आरपिआयच्या कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालय कुरखेडा समोर निदर्शने करून तहसिलदार जाधव यांच्या मार्फतीने देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदन सादर केले.निदर्शना दरम्यान, ‘केंद्रिय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हटाव,देश के शिक्षण व्यवस्था को बचाव’ असे नारे देत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
प्रसंगी निवेदन सादर करतांना रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर,उपाध्यक्ष दशरथ साखरे,मारोती भैसारे,डोमाजी नंदेश्वर,विदर्भ राज्य आंदोलन समितीचे घिसु पाटिल खुणे,समता सैनिक दलाचे मुक्ता दुर्गे, अभिमन्यु बनसोड,रिपाईचे तालुकाध्यक्ष सुनिल सहारे, सचिव मोहन मेश्राम,ताराचंद नंदेश्वर,मारेश्वर राऊत, दादाजी रामटेके,दिलबर जोगे,आर्शिवाद गजभिये, मंगेश भानारकर,बंडू सहारे,जांभुळकर,महिला आघाडीच्या लता सहारे,विलासिनी राऊत,बबिता रामटेके,सरदारे आदिसहीत बहुसंख्य रिपाईचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisement -

