Thursday, September 3, 2026
Homeकुरखेडाट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार दोघे जागीच ठार.. - कढोली-गांगुली(घाटी)मार्गावरील घटना..

ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार दोघे जागीच ठार.. – कढोली-गांगुली(घाटी)मार्गावरील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या कढोली-गांगुली(घाटी)मार्गावरील खवल्या देवस्थान  जवळ ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार  दोघे ट्रक खाली येऊन जागीच ठार झाल्याची घटना आज,मंगळवार २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.ट्रकची धडक इतकी भीषण होती की, एकाचा मृतदेह मुख्य मार्गावर छिन्न-विच्छिन्न झाला.अपघातात प्रज्वल प्रल्हाद अलाम वय २५ वर्षे व त्याचा मित्र सुमित गुणाजी उईके वय २२ वर्षे दोघेही रा.नरचूली ता.आरमोरी, जि.गडचिरोली अशी मृतकांची नावे आहेत.
माहितीनुसार,प्रज्वल व त्याचा मित्र सुमित
हे दोघेही आज मंगळवारी एमएच ३३ एजी ९२५६ क्रमांकाच्या दुचाकीने नरचूली येथून कुरखेडा तालुक्याच्या पळसगांव येथे राहणाऱ्या बहिणीची भेट घेण्याकरीता निघाले होते.अश्यातच कढोली-कुरखेडा मुख्य मार्गावरील गांगुली नजीक असलेल्या खवल्या देवस्थानाजवळ विरूद्ध दिशेने छत्तीसगड वरून येणारा ट्रक क्रमांक-सीजी ०४ एनक्यू ८३१७ याची दुचाकीला समोरासमोर धडक बसली.यावेळी दोन्ही युवक ट्रक खाली आल्याने दोघांचाही जागीच मृत्यु झाला व त्यांच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे झाले. अपघातानंतर ट्रकने घटणास्थळावरून पळ काढला.मात्र,वैरागडजवळ गावकऱ्यांनी ट्रक व चालकाला अडवत पोलिसांना माहीती दिली.घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरीता कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात पाठविले.पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!