Thursday, September 3, 2026
Homeनागपूरअपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.वैभव शंकर खोब्रागडे वय ३५ वर्षे,मूळ रा.वैरागड,ता.आरमोरी, जि. गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या शिक्षकाचे नाव आहे.वैभव खोब्रागडे हे बुटीबोरी येथील बालाजी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते.तर बालाजी नगर येथे वास्तव्यास होते.
वैभव खोब्रागडे हे घटनेच्या दिवशी म्हणजेच मंगळवार १ सप्टेंबर २०२६ रोजी ते आपल्या एमएच ३१ एक्यू २९८५ क्रमांकाच्या दुचाकीने वर्धा येथील कार्यक्रम आटोपून नागपूरच्या दिशेने परत येत होते.दरम्यान,रात्री १० वाजेच्या सुमारास सिडको कॉलनी मार्गावर टीएन ९३ जे २७९५ क्रमांकाचा ट्रक धोक्याची कोणतीही सूचना न देता रस्त्यात उभा करण्यात आला होता.मार्गावर अंधार असल्याने वैभव यांना उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज आला नाही.त्यामुळे त्यांची दुचाकी ट्रकच्या मागील भागावर जोरदार आदळली.या भीषण धडकेत ते गंभीर जखमी झाले.अपघातानंतर वैभव यांना नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,उपचार सुरू असतांनाच रात्रीच त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी त्यांची आई चंदा शंकर खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून बुटीबोरी पोलिसांनी निष्काळजीपणे ट्रक उभा करणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.शिक्षकाच्या दुर्दैवी मृत्यूने बुटीबोरी परिसर व त्यांच्या मूळ गावी हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!