- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या स्मृतींना उजाळा देणारा ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आज, मंगळवार २० ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता नागपूरच्या दीक्षाभूमीवर होणार आहे.या सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी नागपुरात दाखल झाले आहेत. “जयघोष बा भीमाचा,नाही कुण्या बापाचा” अशी भीम गर्जना अनेकांच्या मुखी पडली आहे.
दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मुख्य सोहळ्याला आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मप्रचारक, इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ युनायटेड नेशन्स डे ऑफ वैशाखचे उपाध्यक्ष आणि फ्रान्समधील प्राकुंट बुद्धिस्ट अकादमीचे अध्यक्ष भदंत डॉ.टी.धम्म रतन आणि म्यानमारचे भदंत वन्ना सिरी महाथेरो हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील.यासोबतच उच्च न्यायालयातील अधिवक्ता ॲड.शैलेश नारनवरे, दिल्लीचे भंते करुणाकरण आणि बेंगळुरूचे जिग्मे सुल्ट्रीम महाथेरो हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.मुख्य सोहळ्यात ॲड.नारनवरे महाबोधी महाविहार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सद्यस्थिती तसेच पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत उपस्थित अनुयायांना सविस्तर माहिती देतील. त्याचबरोबर नागपूर सुधार प्रन्यास,नागपूरच्या माध्यमातून सुरू असलेल्या दीक्षाभूमीच्या सौंदर्गीकरणाच्या कामाची माहितीही यावेळी देण्यात येणार असल्याचे स्मारक समितीने स्पष्ट केले आहे.
- Advertisement -

