Monday, October 5, 2026
Homeनागपूरलोखंडी पाईपांच्या आड गांजाची तस्करी; तिघांना अटक..

लोखंडी पाईपांच्या आड गांजाची तस्करी; तिघांना अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-लोखंडी पाईपांच्या आड लपवून आणलेला तब्बल ५०० किलो गांजाचा साठा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एनसीबी)नागपुरात जप्त केला.हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्कायलाइन ढाब्याजवळ पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली.याप्रकरणी दोघांसह गांजाचा मुख्य स्वीकारकर्ता असे तिघांना एनसीबीने अटक केली.
पश्चिम बंगालमधील दोन तस्कर ओडिशाच्या संबलपूरहून गांजाचा मोठा साठा घेऊन नागपूरला येणार असल्याची गोपनीय माहिती एनसीबीला मिळाली होती.हा साठा नागपूरमधील मुख्य स्वीकारकर्ता एस.ए.एस.युसूफ याच्याकडे सुपूर्द केला जाणार होता.या माहितीच्या आधारे,एनसीबी अधिकाऱ्यांनी नागपूरमध्ये पाळत ठेवली आणि संशयित ट्रकच्या हालचालींवर लक्ष ठेवले.पहाटे नागपूर-भंडारा मार्गावरून जात असतांना हुडकेश्वर भागातील आउटर रिंग रोडवरील महादेव ढाब्याजवळ हा ट्रक अडवण्यात आला.पथकाने तपासणी केली असता ट्रकमध्ये वरच्या बाजूला लोखंडी पाईप ठेवले होते.तर त्याखाली लपवून ठेवलेला तब्बल ५०० किलोचा गांजा आढळून आला.ट्रकमध्ये असलेल्या पश्चिम बंगालमधील आर.पी.गोलदार आणि आर्यन सरकार यांना एनसीबीने ताब्यात घेतले.प्राथमिक चौकशीत त्यांनी नागपुरातील गांजाचा मुख्य स्वीकारकर्ता एस.ए.एस.युसूफ ऊर्फ राजाभाई याचे नाव सांगितले.त्यानंतर पथकाने सापळा रचून युसूफलाही अटक केली.चौकशीत युसूफ चार वर्षांपासून गांजा तस्करीच्या नेटवर्कमध्ये सक्रिय होता. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये(एनडीपीएस)गुन्हे दाखल आहेत. चौकशीनुसार,गांजाची ही खेप ओडिशातील संबलपूर येथून ट्रकमध्ये भरली होती.गोलदार आणि आर्यन सरकार यांच्यावर ती नागपुरात युसूफपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी होती.नागपुरातून पुढे गांजाचा पुरवठा महाराष्ट्रातील जालना आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे केला जाणार असल्याचे तपासात समोर आले आहे.पोलिस आणि तपास यंत्रणांच्या नजरेतून बचाव करण्यासाठी आरोपी महामार्गावरील मार्ग बदलून ट्रक चालवत असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला गडचिरोलीत ‘पेंशन अदालत’ व कार्यशाळा.. – निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणी सुटणार जागेवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कोषागार कार्यालय,गडचिरोली अंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांच्या अडचणींचे निरसन करण्यासाठी उद्या,मंगळवार ६ ऑक्टोंबरला ‘पेंशन अदालत’आयोजित करण्यात आली...

आज भारतीय किसान संघातर्फे ट्रॅक्टर मोर्चा; चार जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शेतकरी होणार सहभागी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-धानाला योग्य हमीभाव,प्रलंबित बोनस तातडीने द्यावा,दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळलेले भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुके  समाविष्ट करावेत आणि धानाचे चुकारे ४८...

“उमेद मॉल”च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणार मोठे व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य...

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!