Tuesday, September 29, 2026
Homeनागपूरअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी पाच महिन्यांची गर्भवती,तरुणाला अटक..

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी पाच महिन्यांची गर्भवती,तरुणाला अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला.विशेष म्हणजे,मुलीची प्रकृती बिघडल्याने वैद्यकीय तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सदरचा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला.याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी १९ वर्षीय श्रीधर ईश्वर राजकट्टा याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.आरोपी तरुण व मुलीची एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला.एप्रिल २०२६ मध्ये आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.घटनेनंतर काही दिवसांनी मुलीची प्रकृती बिघडली.त्यामुळे कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता तपासणीदरम्यान ती सुमारे पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.सदरचा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.तक्रारीच्या आधारे पोलिसांनी श्रीधर राजकट्टा याच्या विरोधात पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदविला व त्यास अटक केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलिसांची कोंबडा बाजारावर धाड; पाच जणांना रंगेहाथ अटक..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही ते चिचगाव मार्गावरील जंगलशिवारात कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून जुगार खेळणाऱ्या पाच जणांना ब्रम्हपुरी पोलिसांनी रंगेहाथ अटक...

आष्टी व अहेरीतील रुग्णालयांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि गावंडे यांनी नुकतेच ग्रामीण रुग्णालय आष्टी,उपजिल्हा रुग्णालय अहेरी आणि महिला व बाल रुग्णालय अहेरी येथे भेट देऊन...

चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातून आज,सोमवार २८ सप्टेंबरच्या दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका चिवडा सेंटरमधील चिवडा खाल्ल्यानंतर तब्बल सात जणांना विषबाधा...

माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी- अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी,असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले. आंतरराष्ट्रीय माहिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!